हॅमिल्टननंतर वेलिंग्टनमध्ये अॅक्शन रिप्ले, सलग दुसऱ्या टाय सामन्यात भारताचा विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सलग दुसरा आणि  मालिकेतील चौथा टी 20 सामनाही थरारक झाला. हा सामनाही टाय झाल्याने सुपर ओव्हरमध्ये या सामन्याचा निकाल लागला.

Ind vs NZ T20 tie, हॅमिल्टननंतर वेलिंग्टनमध्ये अॅक्शन रिप्ले, सलग दुसऱ्या टाय सामन्यात भारताचा विजय

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सलग दुसरा आणि  मालिकेतील चौथा टी 20 सामनाही (Ind vs NZ T20 tie) थरारक झाला. हा सामनाही टाय झाल्याने सुपर ओव्हरमध्ये या सामन्याचा निकाल लागला. भारताने या सामन्यातही हॅमिल्टनच्या सामन्याची (Ind vs NZ T20 tie) पुनरावृत्ती करत, सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला.  मालिकेतील चौथ्या टी 20 सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडने पुन्हा भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं. भारताने निर्धारित 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या होत्या. मात्र हे आव्हानही पार करण्यात न्यूझीलंडला (Ind vs NZ T20 tie) अपयश आलं. न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद 165 धावा केल्या. त्यामुळे सलग दुसरा टी 20 सामनाही टाय झाला.

यानंतर सुपर ओव्हरमध्ये या सामन्याचा निकाल लागला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 13 धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी भारताला 14 धावांची गरज होती. पहिल्या सामन्यातील विजयीवीर रोहित शर्माला या सामन्यात विश्रांती दिल्याने, भारताकडून के एल राहुल आणि कर्णधार विराट कोहली मैदानात उतरले. राहुलने पहिल्याच चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्यानंतर विराटच्या साथीला संजू सॅमसन मैदानात आला.

मग स्ट्राईकवर असलेल्या विराटने चौथ्या चेंडूवर दोन धावा आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारुन विजय मिळवला. यापूर्वी हॅमिल्टनमध्येही तिसरा टी ट्वेण्टी सामना टाय झाला होता. त्यावेळी रोहित शर्माने सलग दोन षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *