Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babar Azam Net Worth : पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या लिस्टमध्ये बाबर आझमचं नाव, आलिशान कार्सचीही आवड, किती आहे नेटवर्थ ?

Babar Azam : T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने जोरदार कमाई केली आहे. बाबर हा पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे.

Babar Azam Net Worth : पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या लिस्टमध्ये बाबर आझमचं नाव, आलिशान कार्सचीही आवड, किती आहे नेटवर्थ ?
Follow us
| Updated on: Jun 09, 2024 | 2:43 PM

T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आज जबरदस्त सामना पहायला मिळार आहे. आज ( रविवार , 9 जून) या मालिकेत भारत. वि. पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी स्टेडिअममध्ये हा सामना खेळवण्यात येणार असूव संपूर्ण जगतातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. रोहित शर्मा आणि बाबर आझमची टीम या सामन्यात आपली ताकद दाखवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची एकूण संपत्ती किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

बाबर आझमचे नेटवर्थ

पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पाकिस्तान क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझम याच्या नावाचा समावेश आहे. बाबर आझम हा पीसीबीचा ए ग्रेड खेळाडू आहे. तो अनेक T20 लीगही खेळतो. याशिवाय तो अनेक ब्रँड्सचा ॲम्बेसेडर देखील आहे. बाबर आझम याच्याकडे लक्झरी कारचे कलेक्शनही आहे. 29 वर्षीय बाबर आझमची एकूण संपत्ती 41 कोटी रुपये आहे.

बाबर आझमच्या कमाईचा प्रमुख स्त्रोत

धुवांदार फलंदाजी करत बॅटने चेंडू बाऊंड्रीच्या पलीकडे पाठवणे अर्थात क्रिकेट खेळणे हाच बाबरच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबतच्या त्याच्या ए ग्रेड करारानुसार त्याला दरमहा 30 लाख रुपये मिळतात. कसोटी सामन्यासाठी त्याला 12.5 लाख रुपये, वनडेसाठी 6.4 लाख रुपये आणि टी-20साठी 4.2 लाख रुपये मिळतात.

टी20 लीगमध्ये करतो बक्कळ कमाई

बाबरने पाकिस्तान सुपर लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीला 20 लाख रुपयांत खेळणारा बाबर आता प्लॅटिनम क२टॅगरीमध्ये आला आहे. तिथे त्याला दरवर्षी सुमारे एक कोटी रुपये मिळतात. याशिवाय तो जगभरातील इतर लीगमध्ये खेळूनही बक्कळ कमाई करतो.

ब्रँड ॲम्बेसेडर बनूनही बाबर आझम कमावतो पैसा

स्वच्छ प्रतिमा आणि उत्तम खेळामुळे बाबर अनेक मोठ्या कंपन्यांनी बाबर याला ब्रँड ॲम्बेसेडर म्हमून निवडले आह. त्यामध्ये हेड अँड शोल्जर्स, ग्रे निकोल्स, क्रेडिटबुक, एचबीएल, ऑप्पो, हुआवेई, गेटोरेड, पेप्सी आणि नून पाकिस्तान यांसारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे. प्रत्येक एंडोर्समेंटसाठी तो सुमारे 50 लाख रुपये आकारतो.

आलिशान कार्सचीदेखील आहे आवड

भरपूर कमाई करणाऱ्या बाबरला महागड्या, आलिशान कार्सची आवड आहे. त्याच्याकजे Audi A5, BMW सारख्या आलिशान कार तसेच BAIC BJ40 Plus सारख्या शक्तिशाली जीप आणि Yamaha आणि BMW सारख्या उत्तम बाइक्सचा समावेश आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.