AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Pak : पाकिस्तान त्या लायकच नाही, सूर्यकुमारने जखमेवर चोळलं मीठ, Video

आशिया कप 2025 च्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानला सहज पराभूत केल्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने असं बोल्ड विधान केलंय ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. पाकच्या जखमेवर त्याने सरळ मीठच चोळलं. काय म्हणाला सूर्यकुमार यादव ?

Ind Vs Pak : पाकिस्तान त्या लायकच नाही, सूर्यकुमारने जखमेवर चोळलं मीठ, Video
सूर्यकुमार यादवचं सडेतोड उत्तर व्हायरल
| Updated on: Sep 22, 2025 | 10:54 AM
Share

आशिया कप 2025 मधीलसुपर 4 मध्ये काल पुन्हा भारतचा सामना पाकिस्तानशी झाला. मागच्यावेळेप्रमाण या सामन्यातही भारताने पाकिस्तानला सहज लोळवत पराभूत केलं आणि खणखणीत विजय मिळवला. कालच्या सामन्यात बराच हाय-व्होल्टेज ड्रामाही पहायला मिळाला. पण खरी मजा आली तीसामन्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, कारण तिथे भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने असं एक बोल्ड विधान केलंय ज्यामुळे सगळेच अवाक् झाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये आता कोणतेही शत्रुत्व (rivalry) उरलेले नाही अस तो म्हणाला, ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

खरं तर, कालच्या सामन्यात भारताचा विजय म्हणजे, पाकिस्तानवर सलग सातवा व्हाईट बॉल विजय आहे. आतापर्यंत, दोन्ही संघांनी 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यापैकी 12 मध्ये भारताने सहज विजय मिळवला आहे. पाकिस्तानी संघाला फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. 2022 च्या वर्ल्डकप नंतरहा एकतर्फी विक्रम अधिकच मजबूत झाला आहे.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव ?

दरम्यान आशिया कप स्पर्धेतील काल भारताने पाकला सहज हरवलं. त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली, तेव्हा एका रिपोर्टरने सूर्यकुमार यादवला जो प्रश्न विचारला, त्यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं. यावेळी पाकिस्तान संघ अधिक स्पर्धात्मक वाटतोय का? असा सवाल पत्रकाराने त्याला विचारला. त्यावर सूर्यकुमार यादवने मस्त चिमटा काढला. ” मला वाटतं की आता ( भारत-पाक) शत्रुत्वाबद्दल प्रश्न विचारणं तुम्ही बंद केलं पाहिजे, त्याचं कारण म्हणजे दोन देशांमध्ये (खेळांत) शत्रुत्व किंवा चुरस तेव्हा असते, जेव्हा दोन संघ 15-20 मॅचेस खेळतात आणि त्यात एखादी टी 8-7 अशा फरकाने पुढे असते, तेव्हा त्याला चांगलं क्रिकेट किंवा चुरशीची लढत म्हटलं जातं. पण जेव्हा एकतर्फी लढत असते तेवहा ते फक्त उत्तम क्रिकेट असतं, चुरस नव्हे ” असं तो म्हणाला.

याआधीही दिलं होतं सडेतोड उत्तर

मात्र सूर्यकुमार यादव एवढंच बोलून थांबला नाही, तो पुढे म्हणाला. ” 3-0 किंवा 10-1… आकडे काय नक्की मला माहीत नाही, पण अशी आकडेवारी असेल तर यात चुरस कुठे आली, काहीच उरत नाही ” असं सांगत त्याने पराभूत पाकिस्ताचन्या जखमेवर मीठ चोळलं. काल दुबईत झालेल्या सुपर 4 सामन्यापूर्वीच सूर्यकुमारने प्रतिस्पर्ध्याच्या सामन्याच्या, चुरशीच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या, पण आता त्याने जे स्पष्ट विधान केलं आहे, तो कोणी विसरून शकेल असं वाटत नाही. या दोन्ही संघांमधील ऐतिहासिक सामन्याच्या सातत्याने एकतर्फी स्वरूपाबद्दल, फारच कमी कर्णधारांनी इतके स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.

कालच्या मॅचमध्ये पाकिस्तानने साहिबजादा फरहानच्या अर्धशतकाच्या जोरावर 171 धावा केल्या, त्यामध्ये भारतीय क्षेत्ररक्षकांनी काही झेल सोडले. तथापि, भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल यांनी पाकिस्तानी फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या शानदार शतकी भागीदारीमुळे, भारतीय टीमने 7 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने सामना जिंकला.

पुढली मॅच कधी ?

सोमवारी आशिया कपमध्ये कोणतेही सामने खेळले जाणार नाहीत. स्पर्धेतील पुढील सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात अबू धाबी येथे 23 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता खेळला जाईल. भारताचा पुढील सामना 24 सप्टेंबर रोजी दुबई येथे बांगलादेशविरुद्ध आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.