कोहली आणि राहुलची अर्धशतकी खेळी, भारताचा विडींजवर 6 गडी राखून विजय

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विजय (India vs West Indies T-20) मिळवला.

कोहली आणि राहुलची अर्धशतकी खेळी, भारताचा विडींजवर 6 गडी राखून विजय

हैदराबाद : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विजय (India vs West Indies T-20) मिळवला. हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 6 गडी राखत मात केली (India vs West Indies T-20) आहे. विशेष म्हणजे 3 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली (India vs West Indies T-20) आहे.

वेस्ट इंडिजच्या टीमने 20 षटकांत 5 विकेट गमावत 207 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य दिले. विंडीजने दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने 18.4 षटकात 4 विकेट गमावत 209 धावा केल्या. यात भारताकडून विराट कोहलीने 50 चेंडूत 94 धावांची खेळी केली. तर लोकेश राहुलने 42 चेंडूत 62 धावा केल्या.

विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने थोडीसी सावध सुरुवात केली. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 8 धावा काढून माघारी परतला. यानंतर कोहली आणि राहुलने दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. मात्र 62 धावा करत लोकेश राहुल माघारी परतला. यानंतर ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे काहीशा धावा करत माघारी परतले. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील हा भारताचा सर्वोत्तम धावांचा पाठलाग (India vs West Indies T-20) केला.

दरम्यान वेस्ट इंडीजकडून 2 तर कायरन पोलार्ड आणि शेल्डन कोट्रलने प्रत्येकी 1 विकेट घेतला. वेस्टइंडीजविरोधात भारताचा हा सलग सातवा विजय आहे. या कसोटीतील दुसरा सामना 8 डिसेंबरला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *