AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia | 40 वर्षापूर्वीचा थरार, वन डेच्या मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिलाच सामना, विजेता कोण?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 40 वर्षापूर्वी झाला होता. | India Australia First Match

India vs Australia | 40 वर्षापूर्वीचा थरार, वन डेच्या मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिलाच सामना, विजेता कोण?
| Updated on: Nov 20, 2020 | 7:08 PM
Share

मेलबर्न: भारतीय क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे.  (India vs Australia 2020)भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 27 नोव्हेंबरला होणार आहे. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिला एकदिवसीय सामना कधी झाला होता?. त्यात भारतानं विजय मिळवला की पराभव झाला होता. (India won first one day match against Australia )

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे मॅच

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा इतिहास 88 वर्षांचा आहे. भारतानं एकदिवसीय सामने खेळण्यास 1974 मध्ये सुरुवात केली. भारतीय टीमची काही देशांविरुद्ध कामगिरी दमदार राहिली तर ऑस्ट्रेलियासारख्या देशानं भारतसमोर कायम आव्हान उभं केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिली मॅच 6 डिसेंबर 1980 रोजी झाली. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यांच्या तगड्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी ढेपाळली होती. (India won first one day match against Australia )

भारतानं 6 विकेट गमावून 111 धावा केल्या होत्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या संदीप पाटील यांनी सय्यद किरमानी यांच्यासाथीनं 92 धावांची भागिदारी रचली. पाटील यांनी 91.42 च्या सरासरीनं 4 चौकरासंह 64 धावा केल्या. सय्यद किरमानी यांनी देखील 48 धावा केल्या.  भारतीय टीमनं  49 ओव्हरमध्ये 208 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळं ऑस्ट्रेलियाला 208 धावांचा पाठलाग करताना 42 ओव्हरमध्ये 142 धावा करता आल्या. भारतानं ऑस्ट्रेलियावर 66 धावांनी विजय मिळवला. (India won first one day match against Australia )

संदीप पाटील यांनी गोलंदाजीमध्ये देखील कमाल दाखवत 10 ओव्हरमध्ये 3.10 च्या सरासरीनं 31 धावा देत 1 विकेट घेतली. पाटील यांना  बॅटिंग आणि बॉलिंगमधील चांगल्या कामगिरीमुळं मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला होता. (India won first one day match against Australia )

असा आहे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा 

टीम इंडिया या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये प्रत्येकी 3 एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळणार आहे. यानंतर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. सुधारित संघामध्ये हिटमॅन रोहित शर्माची केवळ कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तर वरुण चक्रवर्थी दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी थंगारासू नटराजनला संधी देण्यात आली आहे. (India vs Australia 2020)

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटला सचिनचे हे 2 विक्रम मोडित काढण्याची संधी

IND vs AUS : कांगारुंविरुद्ध खेळण्यासाठी हिटमॅन सज्ज, टीम मॅनेजमेंटसह चाहते सुखावले

(India won first one day match against Australia )

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.