धोनी फक्त खेळाडू नाही, क्रिकेटचं एक युग आहे : मॅथ्यू हेडन

मुंबई : ”टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा फक्त एक खेळाडू नसून तो क्रिकेटचे एक संपूर्ण युग आहे”, असे मत ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने धोनीविषयी बोलताना व्यक्त केले. नुकतंच स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात हेडनने धोनीची स्तुती केली आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्स या संघाचे सलग 10 …

धोनी फक्त खेळाडू नाही, क्रिकेटचं एक युग आहे : मॅथ्यू हेडन

मुंबई : ”टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा फक्त एक खेळाडू नसून तो क्रिकेटचे एक संपूर्ण युग आहे”, असे मत ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने धोनीविषयी बोलताना व्यक्त केले. नुकतंच स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात हेडनने धोनीची स्तुती केली आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्स या संघाचे सलग 10 वेळा कर्णधारपद भुषवलं आहे, त्यातील तब्बल आठ वेळा चेन्नईने आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. विशेष म्हणजे काल आयपीएलच्या 12 व्या मोसमातील फायनलमध्ये चेन्नई अवघ्या 1 धावाने पराभूत झाली. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला जाणीव होईल की, ‘महेंद्रसिंह धोनी हा फक्त एक खेळाडू नाही. तर तो क्रिकेटचे एक युग आहे’ असेही मॅथ्यू हेडनने म्हणाला.

महेद्रसिंह धोनीने 2004 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास सुरुवात केली. अवघ्या तीन वर्षात म्हणजेच सप्टेंबर 2007 मध्ये धोनीने ICC T -20 विश्वचषकाचे कर्णधारपद भूषवले. धोनी कर्णधार असतानाचा भारताने टी-20 विश्वचषकावर आपलं नावं कोरलं. तसेच 2011 चा विश्वचषकावेळी धोनीने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. यांसारख्या इतर कारणामुळे महेंद्रसिंह धोनीला हा टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळखलं जात.

स्टार स्पोर्टच्या कार्यक्रमात मॅथ्यू हेडनला धोनी खेळाडू म्हणून कसा आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ”महेंद्रसिहं धोनीचे जगभरात चाहते आहेत. धोनी हा फक्त एक खेळाडू नाही तर क्रिकेटचे एक युग आहे. कधी कधी तर धोनी मला गली क्रिकेट टीमच्या कॅप्टनसारखा वाटतो. जो आपल्या टीमसाठी सर्व करण्यासाठी तयार असतो”, असे तो म्हणाला.

धोनी प्रत्येक मॅचपूर्वी एखाद्या परीक्षेप्रमाणे अभ्यास करतो. मॅचदरम्यान फिरकी गोलंदाजाना कशाप्रकारे गोलंदाजी करण्यास सांगणे, एखाद्या फलंदाजाचा झेल पकडणे, त्याला बाद करणे यांसारखे सर्व बारकावे धोनीला खूप चांगले अवगत झाले आहे. आजही अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू त्याच्याशी चर्चा करुन क्रिकेटमधील बारीक सारीक गोष्टी समजून घेतात. असं असलं तरीही धोनी हा कायमच शांत असतो. म्हणूनच त्याला ‘कॅप्टन कुल’ या नावाने ओळखलं जातं. मॅचदरम्यान धोनी तुमच्या आजूबाजूला असेल तरीही तुम्हाला खूप हायसं वाटतं असेही धोनीची स्तुती करताना हेडन म्हणाला.

विशेष म्हणजे महेंद्रसिंह धोनीला जगभरात दिग्गज खेळाडू म्हणूनही ओळखलं जातं. आयपीएलच्या संघाचा कर्णधारापेक्षा त्याला भारताचा कर्णधार म्हणून सर्वात जास्त ओळखलं जातं असेही हेडन म्हणाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *