भारतीय क्रिकेट संघ संकटात, ती एक चूक नडली, गाैतम गंभीर थेट पोहोचला या मंदिरात, फोटो…
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावला. मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर थेट मंदिरात पोहोचला आहे.

भारतीय क्रिकेट संघ संकटात असून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकाता येथे खेळला गेला. या सामन्यात भारताला अपयश मिळाले आणि दक्षिण आफ्रिकेने भारताचा दारूण पराभव केला. 30 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यजमान संघाच्या पराभवात ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीची स्थिती महत्त्वाची भूमिका बजावत होती असे अनेकांचे मत आहे. सध्या खेळपट्टीच्या मुद्द्यावरून गाैतम गंभीरला खडेबोल सुनावले जात आहेत. गाैतम गंभीरचे खेळापेक्षा अधिक लक्ष खेळपट्टी भारताच्या बाजूने अनुकूल कशी करता येईल यावर होते आणि भारतीय संघ यामध्येच फसला.
भारतीय क्रिकेट संघ अडचणीत
कोलकाता कसोटी पराभवामुळे गंभीर भारताच्या घरच्या कसोटीतील रेकॉर्डबाबत कठीण स्थितीत आहे. गाैतम गंभीरला भारतीय प्रशिक्षकपदावरून काढण्याचीही मागणी केली जात आहे. दुसरा कसोटी मालिका गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघाला कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरी कसोटी मालिका आपल्या नावावर करावी लागणार आहे. मात्र, भारतासमोर तगडे आव्हान नक्कीच असणार आहे.
गाैतम गंभीरवर खेळपट्टीच्या मुद्द्यावरून टीका
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावला. मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाणार त्यापूर्वीच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर प्रमुख शक्तीपीठ माँ कामाख्याचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. संघ संकटात असताना गाैतम गंभीरने कामाख्या देवीचे आर्शीवाद घेतली आहेत.
कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहोचला गाैतम गंभीर
मुळात म्हणजे गौतम गंभीरची कामाख्या देवीवर खूप श्रद्धा आहे. भारतीय संघ जून ते ऑगस्ट दरम्यान इंग्लंडचा दौरा करत होता, जिथे पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आल्या. त्या मालिकेपूर्वी गौतम गंभीरने कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शन घेतले. खेळपट्टीच्या वादात गाैतम गंभीर याच्यावर टीका होत आहे. गाैतम गंभीरने भारतीय संघासाठी ज्याप्रकारे खेळपट्टी केली, त्यामध्ये भारतीय संघ फसला. खेळपट्टीबाबत त्याने अनेक मिटिंग घेतल्याचीही माहिती मिळतंय. खेळपट्टीच्या मुद्द्यावरून गाैतम गंभीर आणि शुभमन गिल यांच्यातही खटके उडाली.
