दोन दिवसात दोन परदेशी टेनिस खेळाडू भारताच्या सून बनल्या

भारताचा स्टार टेनिस खेळाडू दिविज शरणने ब्रिटेनची स्टार टेनिस खेळाडू समंथा मरेशी विवाह केला आहे. तर माजी टेनिस खेळाडू स्टीफन अमृतराज यानेही अमेरिकेची स्टार खेळाडू एलिसन रिस्के हिच्याशी लग्न केले आहे.

दोन दिवसात दोन परदेशी टेनिस खेळाडू भारताच्या सून बनल्या


मुंबई : भारताचा स्टार टेनिस खेळाडू दिविज शरणने (Divij Sharan) नुकतंच ब्रिटेनची स्टार टेनिस खेळाडू समंथा मरे (Samantha Murray) हिच्याशी विवाह केला आहे. तर दुसरीकडे माजी टेनिस खेळाडू स्टीफन अमृतराज (Stephen Amritraj) यानेही अमेरिकेची स्टार खेळाडू एलिसन रिस्के (Alison Riske) हिच्याशी लग्न केले आहे. यामुळे दोन दिवसात दोन परदेशी टेनिस खेळाडू भारताच्या सून बनल्या.

टेनिसपटू शरणने ट्विटरवर आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्या पोस्टला त्याने ‘माझी बेस्ट पार्टनर’असे कॅप्शन दिले आहे. तर दुसरीकडे समंथाने लग्नाचा फोटो पोस्ट करत ‘परफेक्ट मॅच’ असे लिहीले आहे.

दिविज शरण हा दिल्लीमध्ये राहणार आहे. त्याने आतापर्यंत पुरुषांच्या गटात टेनिस स्पर्धेत चार एटीपी टूर टायटल्स जिंकले आहेत. त्याशिवाय डेविस कपमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर दुसरीकडे शरणची पत्नी समंथा ही ब्रिटेनची स्टार टेनिसपटू आहे.

तर दुसरीकडे लॉस एंजेल्समध्ये जन्मलेल्या 35 वर्षीय स्टीफनने एलिसन रिस्के हिच्याशी लग्न केले आहे. शरणप्रमाणे स्टीफननेही डेविस कपमध्येही भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. विशेष म्हणजे स्टीफन हा भारताचे माजी टेनिसपटू आनंद अमृतराज यांचा मुलगा आहे.

स्टीफनने आपल्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. “हा माझ्या जीवनातील सर्वात चांगला दिवस आहे. कारण मी माझ्या स्वप्नसुंदरी एलिसन रिस्के हिच्याशी लग्न करत आहे”, असे कॅप्शनही त्याने या फोटोला दिले आहे. तसेच या मित्र आणि नातेवाईंकाचे आभार मानले आहे.

तर दुसरीकडे स्टीफनची पत्नी रिस्केनेही सोशल मीडियावर लग्नासंबंधीचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केलेत. विंबलडनच्या क्वार्टरफायनल मध्ये धडकणाऱ्या रिस्केनेही एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात तिने एका बॉलिवूडच्या ‘नच देने सारे’ या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे या गाण्यावर ती अगदी भारतीय पद्धतीने थिरकताना दिसत आहे.

मी आता अधिकृतरित्या अमृतराज झाली आहे. स्टीफनमुळे मी स्वत: ला खूप नशीबवान महिला समजते. माझे नवे फॉलोवर्स कुठे आहेत. तुमच्या सर्वांचे मन जिंकण्यासाठी माझ्याकडून बॉलिवूडकरांप्रमाणे एक छोटासा प्रयत्न असे कॅप्शनही तिने या व्हिडीओला  दिले आहे.

 

View this post on Instagram

 

since this has come to be a fan favorite, (???), I want to share the story of how it came to be! My sister, Sarah, has an Indian customer whose wife, Gayatri, helped us. Gayatri chose the song and came up with the choreography for us. Sarah would visit each month for business and sneak in a dance lesson, learn the moves, slow them down, and then send them to me via text while I was on the road! I started learning it during Dubai in February. We practiced it together for the first time 6 days ago. It was the perfect surprise for @stephenamritraj and his wonderful family! Thanks to @prakashamritraj & @jenny_brady7 for keeping the secret- they were the only ones who knew- along with my family of course! Blessed to be an Amritraj!?????❤️you can watch the rest on my Twitter. Ps. Yes, my sis is pretty kickass.?

A post shared by Alison Riske-Amritraj???? (@riske4rewards) on

त्याशिवाय तिने तिच्या इंस्टाग्रामवरही एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिने ती कशाप्रकारे हा बॉलिवूड डान्स शिकली याबाबतची सर्व माहिती सांगितली आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर लगेचच तिने तिच्या सोशल मीडियावरील एलिसन रिस्के नावातही बदल करत एलिसन रिस्के अमृतराज असे ठेवले आहे. यासोबत पुढे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचा झेंड्याची प्रतिकृतीही तिने लावली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI