IPL 2020, QUALIFIER 2, DC vs SRH : दिल्लीची हैदराबादवर 17 धावांनी मात, अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार

दिल्लीकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

IPL 2020, QUALIFIER 2, DC vs SRH : दिल्लीची हैदराबादवर 17 धावांनी मात, अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 12:13 AM

अबुधाबी : क्वालिफायर 2 च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 17 धावांनी मात केली आहे. या विजयासह दिल्लीने आयपीएलच्या फायनलमध्येच पहिल्यांदाच धडक मारली आहे. तर पराभवामुळे हैदराबादचे आव्हान संपुष्टात आलं आहे. दिल्लीने हैदराबादला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 172 धावाच करता आल्या. हैदराबादकडून केन विल्यमसनने सर्वाधिक 67 धावा केल्या. तर दिल्लीकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची खराब सुरुवात झाली. दिल्लीच्या 12 धावा असताना पहिला धक्का लागला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर 2 धावांवर बाद झाला. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी 31 धावा जोडल्या. मात्र 43 धावसंख्या असताना मार्कस स्टोयनिसने हैदराबादला दुसरा धक्का दिला. प्रियम गर्ग 17 धावा करुन माघारी परतला. गर्गमागोमाग मनिष पांडे 21 धावांवर बाद झाला. त्यामुळे हैदराबादची 44-3 अशी स्थिती झाली.

यानंतर चौथ्या विकेटसाठी केन विल्यमसन आणि जेसन होल्डर या दोघांनी 46 धावांची भागीदारी केली. मात्र ही जोडी तोडायला अक्षर पटेलला यश आले. अक्षरने होल्डरला 11 रन्सवर आऊट केलं. होल्डर बाद झाल्यानंतर विल्यम्सन आणि अब्दुल समद यांनी हैदराबादचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान विल्यम्सनने आपले अर्धशतक पूर्ण केलं. मात्र 67 धावावंर असताना मार्कस स्टोयनिसने विल्यमसनला निर्णायक क्षणी बाद केलं. विल्यम्सनने 45 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 67 धावांची झुंजार खेळी केली.

विल्यम्सन बाद झाल्यनंतर अब्दुल समदने दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. समदने फटकेबाजी करायला सुरुवात केली. यामुळे सामना आणखी रंगतदार स्थितीत पोहचला. मात्र कगिसो रबाडाने अब्दुल समदच्या या खेळीला ब्रेक लावला. रबाडाने समदला 33 धावांवर किमो पॉलच्या हाती कॅच आऊट केलं. समदने 16 चेंडूत 2 सिक्स आणि 2 फोरसह तडाखेदार 33 धावा केल्या. यानंतर पुढील चेंडूवर रबाडाने रशिद खानला 11 धावांवर बाद केले. यानंतर श्रीवत्स गोस्वामीला शून्यावर आऊट केलं. रबाडाने 19 व्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत सामन्याचं चित्र बदललं. दिल्लीकडून रबाडाने 4 विकेट्स घेतल्या. तर मार्कस स्टोयनिसने 3 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेलने 1 विकेट मिळवली.

त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. दिल्लीकडून ‘गब्बर’ शिखर धवनने 50 चेंडूत 78 धावांची खेळी केली. यामध्ये शिखरने 6 चौकार आणि 2 षटकार खेचले. तर मार्कस स्टोयनिसने 38 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने 21 धावा केल्या. तसेच शेवटच्या काही षटकात शिमरॉन हेटमायरने फटकेबाजी केली. शिमरॉनने 22 चेंडूत नाबाद तडाखेदार 42 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 फोर आणि 1 सिक्स लगावला. हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि रशिद खान या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला. दरम्यान या विजयामुळे दिल्लीची गाठ अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध पडणार आहे. अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे.

ipl 2020 dc vs srh qualifier 2 live score update today cricket match delhi capitals vs sunrisers hyderabad live लाईव्ह स्कोअर  

[svt-event title=”हैदराबादचा पराभव करत दिल्लीची अंतिम सामन्यात धडक” date=”08/11/2020,11:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला आठवा धक्का” date=”08/11/2020,11:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला सातवा धक्का” date=”08/11/2020,11:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला सहावा धक्का ” date=”08/11/2020,11:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला पाचवा धक्का ” date=”08/11/2020,11:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केन विल्यम्सनचे दमदार अर्धशतक” date=”08/11/2020,10:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला चौथा धक्का ” date=”08/11/2020,10:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला तिसरा धक्का” date=”08/11/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला दुसरा धक्का” date=”08/11/2020,9:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला मोठा धक्का” date=”08/11/2020,9:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात” date=”08/11/2020,9:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 190 धावांचे आव्हान” date=”08/11/2020,9:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला तिसरा धक्का” date=”08/11/2020,9:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा धक्का” date=”08/11/2020,8:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”13 ओव्हरनंतर दिल्ली ” date=”08/11/2020,8:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिखर धवनचे अर्धशतक” date=”08/11/2020,8:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पहिला धक्का” date=”08/11/2020,8:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर दिल्ली ” date=”08/11/2020,8:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीची अर्धशतकी सलामी भागीदारी” date=”08/11/2020,7:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीची शानदार सुरुवात” date=”08/11/2020,7:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात” date=”08/11/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”08/11/2020,7:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असा आहे हैदराबादचा संघ” date=”08/11/2020,7:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पृथ्वीला शॉ अखेर डच्चू” date=”08/11/2020,7:20PM” class=”svt-cd-green” ] मागील काही डावांमध्ये सातत्याने निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉ ला क्वालिफायर 2 सामन्यातून डच्चू देण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचे अंतिम 11 खेळाडू” date=”08/11/2020,7:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीने टॉस जिंकला ” date=”08/11/2020,7:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

दिल्लीला दुहेरी संधी

क्वालिफायर 1 चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळण्यात आला. यामध्ये मुंबईने दिल्लीचा पराभव केला. मात्र दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याने फायनल गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे. तसेच दिल्लीने साखळी फेरीतील 4 सामने सगल गमावले. साखळी फेरीत बंगळुरुचा पराभव करत प्ले ऑफचं तिकीट कन्फर्म केलं. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादने सलग 4 सामने जिंकत क्वालिफाय 2 मध्ये धडक मारली आहे.

तसेच साखळी फेरीत हे दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने भिडले. या दोन्ही साखळी सामन्यात हैदराबादने दिल्लीचा पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 17 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 17 पैकी 11 सामन्यात हैदराबादने दिल्लीवर शानदार विजय मिळवला आहे. तर दिल्लीला 6 सामन्यात हैदराबादवर मात करता आली आहे. त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत हैदराबाद दिल्लीवर वरचढ आहे. मात्र या क्वालिफायर सामन्यात नक्की कोण कोणावर वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), कगिसो रबाडा, मार्कस स्टोयनिस, संदीप लामिछाने, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, अमित मिश्रा, एनरिच नोर्तजे आणि डॅनियल सॅम्स

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कप्तान), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनिष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन अॅलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी.

संबंधित बातम्या :

IPL 2020, DC vs SRH : दिल्लीच्या विजयाचा रथ सनरायजर्स हैदराबादने रोखला, 15 धावांनी दिल्लीचा पराभव

IPL 2020, SRH vs DC : सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी शानदार विजय

IPL 2020, Qualifier 2 : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो, Qualifier 2 सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता

ipl 2020 dc vs srh qualifier 2 live score update today cricket match delhi capitals vs sunrisers hyderabad live

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.