IPL 2020, KXIP vs MI : सीमारेषेवर ग्लेन मॅक्सवेल-जेम्स निशाम जोडीची अद्भुत फिल्डिंग, हिटमॅन रोहित शर्माचा पकडला कॅच

या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने 70 धावा केल्या.| (Glenn Maxwell and James Neesham Super Catch )

IPL 2020, KXIP vs MI : सीमारेषेवर ग्लेन मॅक्सवेल-जेम्स निशाम जोडीची अद्भुत फिल्डिंग, हिटमॅन रोहित शर्माचा पकडला कॅच
sanjay patil

|

Oct 02, 2020 | 3:33 PM

अबुधाबी : किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात 1 ऑक्टोबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यात मुंबईने पंजाबचा 48 धावांनी पराभव केला. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने (Hitman Rohit Sharma) 70 धावा केल्या. रोहित शर्माचा बाऊंड्री लाईनवर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)-जेम्स निशाम (James Neesham) जोडीने भन्नाट कॅच पकडला. त्यामुळे रोहितला डग आऊटमध्ये परतावे लागले. (Glenn Maxwell and James Neesham Super Catch )

नक्की काय झालं ?

बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. मात्र यानंतर रोहितने मुंबईचा डाव सावरला. पंजाबचा वेगवान बोलर मोहम्मद शमी 17 वी ओव्हर टाकायला आला. रोहितने 17 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जवळपास सीमारेषा पार गेला होता. मात्र ग्लेन मॅक्सवेलने कॅच पकडली. पण सीमारेषेवर मॅक्सवेलचा तोल गेला. त्याआधी मॅक्सवेलने सीमारेषेच्या आत असलेल्या जेम्स निशामच्या दिशेने चेंडू फेकला. जेम्सने यशस्वीरित्या कॅच पकडला. या दोघांच्या भन्नाट फिल्डिंगमुळे रोहित शर्माला 70 धावांवर माघारी परतावे लागले.

https://twitter.com/Cric_life59/status/1311691012935282688

या जोडीने पकडलेल्या भन्नाट कॅचमुळे पंजाबच्या डग आऊटमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. विशेष म्हणजे पंजाबचे फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्स (Jhonty Rhods) यांनीही या दोघांचे कौतुक केलं.

या मोसमाच्या सुरुवातीपासूनच पंजाब चांगली फिल्डिंग करतोय. निकोलस पूरनने (Nicholas Pooran)अशाच प्रकारे बाउंड्री लाईनवर फिल्डिंग केली होती. राजस्थान विरुद्ध 27 सप्टेंबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यात संजू सॅमसनने (Sanju Samson) मोठा फटका मारला होता. मात्र पूरनने हवेत झेप घेतली. झेप घेत पूरनने संघासाठी 4 धावा वाचवल्या. त्याच्या या प्रयत्नांसाठी क्रिकेट क्षेत्रातील सर्व दिग्गजांकडून कौतुक करण्यात आलं.

रोहित शर्माच्या 5 हजार धावा

रोहित शर्माने पंजाब विरुद्धच्या या सामन्यात विक्रम केला. चौकार ठोकत रोहितने हा विक्रम केला. रोहितने आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा रोहित तिसराच भारतीय खेळाडू ठरला. याआधी अशी कामगिरी केवळ विराट कोहली (Virat Kohli) आणि सुरेश रैनाने (Suresh Raina) केली आहे. दरम्यान पंजाब विरुद्धच्या विजयानंतर मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक

IPL 2020 : वेगापेक्षा वेगवान, चित्यासारखा चपळ, फिल्डिंगचा बादशाहा जॉन्टी ऱ्होड्सचा भन्नाट झेल

(Glenn Maxwell and James Neesham Super Catch )

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें