IPL 2020, MI vs RCB : यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहचे आयपीएलमधील 100 विकेट्स पूर्ण

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्सचा पराभव करत प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे.

IPL 2020, MI vs RCB : यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहचे आयपीएलमधील 100 विकेट्स पूर्ण

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 48 वा सामना आज (28 ऑक्टोबर) खेळला गेला. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळला गेला. सूर्यकुमार यादवच्या नाबाद 79 धावांच्या जोरावर मुंबईने बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. जसप्रीत बुमराहने बंगळुरुच्या 3 फलंदाजांना बाद केलं. त्याने 4 ओव्हरमध्ये 13 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यामध्ये 1 मेडन ओव्हरचा समावेश होता. यासह बुमराहने विक्रमी कामगिरी केली. IPL 2020 MI vs RCB Mumbai Indians Jasprit Bumrah Take 100 Wickets In IPL

जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये  100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. बुमराहने बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला बाद करत  100 वी विकेट घेतली. बुमराहने 89 सामन्यात 100 विकेट्स पूर्ण केल्या. विशेष म्हणजे बुमराहने आयपीएलमध्ये पहिली विकेटही विराट कोहलीला बाद करत मिळवली होती. बुमराहच्या नावावर एकूण 102 विकेट्सची नोंद झाली. यासह त्याने झहीर खानच्या कामगिरीशी बरोबरीही केली.

बुमराहची आयपीएल कारकिर्द

जसप्रीत बुमराहने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं. बुमराहने आतापर्यंत 89 सामन्यात एकूण 102 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराह 17 व्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत लसिथ मलिंगा, ड्वेन ब्राव्हो, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, आशीष नेहरा, झहीर खान आणि आर विनय कुमार या वेगवान गोलंदाजांनीच 100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे बुमराह आयपीएलमध्ये 100 विकेट्स पूर्ण करणारा 8 वा वेगवान गोलंदाज ठरला.

बुमराहची यंदाच्या मोसमातील कामगिरी

बुमराहने आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. बुमराहने या मोसमातील 12 सामन्यात 20 विकेट्स घेतल्या आहे. बुमराहने 20 धावा देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. ही त्याची सर्वोत्कृष्ठ कामगिरी आहे. यंदाच्या मोसमात मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट आणि बुमराह हे दोघे दमदार गोलंदाजी करत आहेत.

सर्वाधिक विकेट्स

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. मलिंगाने 122 सामन्यात 170 विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमित मिश्रा आहे. मिश्राने 150 मॅचेसमध्ये 160 बळी घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पीयूष चावला आहे. चावलाने 164 सामन्यात 156 फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, MI vs RCB : सूर्यकुमार यादवची धमाकेदार खेळी, मुंबईची बंगळुरुवर 5 विकेट्सने मात, प्ले ऑफमध्ये धडक

IPL 2020, SRH vs DC : “आमचा मोठा पराभव, आम्ही पावर-प्लेमध्येच सामना गमावला”, कर्णधार श्रेयस अय्यरची कबुली

IPL 2020 MI vs RCB Mumbai Indians Jasprit Bumrah Take 100 Wickets In IPL

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI