IPL 2020, SRH vs DC : “आमचा मोठा पराभव, आम्ही पावर-प्लेमध्येच सामना गमावला”, कर्णधार श्रेयस अय्यरची कबुली

संजय पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 28, 2020 | 4:04 PM

सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिट्ल्सचा 88 धावांनी पराभव केला.

IPL 2020, SRH vs DC : आमचा मोठा पराभव, आम्ही पावर-प्लेमध्येच सामना गमावला, कर्णधार श्रेयस अय्यरची कबुली
Follow us

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 47 वा सामना सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 88 धावांनी शानदार विजय मिळवला. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 220 धावांचे आव्हान दिले होते. मात्र दिल्लीला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आले नाही. दिल्लीचा डाव 131 धावांवरच आटोपला. मोसमाच्या सुरुवातीपासून दमदार कामगिरी करणारा दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव ठरला. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली. IPL 2020 We Lost The Match In The Power Play Said Delhi Capitals Captain Shreyas Iyer

श्रेयस काय म्हणाला?

“आमचा मोठ्या फरकाने पराभव झाला. पण यावेळस आम्ही पराभवाचं दु:ख करत बसू शकत नाही. आम्हाला साखळी फेरीतील आणखी 2 सामने खेळायचे आहेत. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी यापैकी केवळ 1 सामना जिंकायचा आहे. आम्ही मागील 3 सामन्यांपासून विजयासाठी आतुर झालो आहोत. हैदराबादविरुद्धच्या पराभवामुळे आम्हाला पुढील सामन्यात आणखी जोमाने खेळ करता येईल”, असं श्रेयस अय्यर म्हणाला.

“हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहा या सलामी जोडीने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 77 धावा केल्या. त्यामुळे आम्ही सामना तिथेच गमावला. पुढील सामन्यात आम्हाला आणखी तयारीने तसेच सकारात्मक मानसिकतेने उतरायचं आहे”, असंही श्रेयसने म्हटलं.

या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडले. वॉर्नर-साहा या जोडीने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये तडाखेबाज 77 धावा केल्या. यासह या जोडीने आयपीएलच्या 13 व्या मोसमात पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. हैदराबादचा पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हा दुसरा सर्वोच्च स्कोअर ठरला. याआधी हैदराबादने 2017 मध्ये पावर प्लेमध्ये 79 धावा केल्या होत्या.

तसेच डेव्हिड वॉर्नरने पावर प्लेमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केलं. त्याने पावर प्लेमध्ये एकूण 54 धावा केल्या. वॉर्नर आयपीएलच्या या मोसमात पावर प्लेमध्ये अर्धशतक ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला. पृथ्वी शॉने या मोसमात याआधी पावर प्लेमध्ये 42 धावा केल्या होत्या. वॉर्नरने 34 चेंडूत 194.12 च्या स्ट्राईक रेटने 8 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने तडाखेदार 66 धावांची खेळी केली.

दरम्यान या विजयासह हैदराबादचा या मोसमातील हा 5 वा विजय ठरला. ताज्या आकडेवारीनुसार हैदराबाद पॉइंट्सटेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद आपले आगामी सामने 31 ऑक्टोबरला बंगळुरुविरुद्ध आणि 3 नोव्हेंबरला मुंबईविरुद्ध खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, SRH vs DC : सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी शानदार विजय

IPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी

IPL 2020 We Lost The Match In The Power Play Said Delhi Capitals Captain Shreyas Iyer

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI