अवघ्या 22 वर्षांचा इशान, 58 चेंडूत 99 धावा ठोकून 'विराट' सेनेचा घाम फोडला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज इशान किशनने धडाकेबाज फलंदाजी केली (MI who is Ishan Kishan).

अवघ्या 22 वर्षांचा इशान, 58 चेंडूत 99 धावा ठोकून 'विराट' सेनेचा घाम फोडला

दुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज इशान किशनने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याच्या फलंदाजीमुळेच सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. त्याने 58 चेंडूत 99 धाव्या केल्या. यामध्ये 9 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. त्याच्या या जबदरस्त फलंदाजीमुळे इशान सोशल मीडियावर चर्चेत आला आहे (MI who is Ishan Kishan).

कोण आहे इशान किशन?

इशान किशनचा जन्म 18 जुलै 1998 रोजी बिहारच्या पाटणा शहरात झाला. इशान लहानपणापासून क्रिकेटमध्ये माहिर होता. इशानची क्षमता ओळखून त्याच्या कुटुंबियांनीदेखील त्याला पाठिंबा दिला. इशांतने मोठ्या भावाच्या सल्ल्यानुसार क्रिकेट क्लब जॉईन केलं. “इशानची प्रतिभा ही भारतीय संघाचा माजी खेळाडू महेंद्रसिंह धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू गिलक्रिस्टसारखी आहे”, असं त्याचे कोच संतोष कुमार यांचं म्हणणं आहे.

इशानच्या क्रिकेट करियरमध्ये त्याचे कोच संतोष कुमार यांची भूमिका महत्त्वाची आहे. बीसीसीआयने जेव्हा काही कारणास्तव बिहार क्रिकेट असोसिएशनची मान्यता रद्द केली तेव्हा संतोष कुमार यांनी इशानला दुसऱ्या राज्यात खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर इशान रांची शहरात गेला.

रांची शहरात इशानने प्रचंड मेहनत केली. अखेर मेहनतीला फळ मिळालं आणि इशानची झारखंडच्या रणजी टीमसाठी निवड झाली. रणजी टॉफी स्पर्धेत दिल्लीविरुद्धच्या सामन्यात इशांनने सर्वाधिक 273 धावा केल्या (MI who is Ishan Kishan).

इशान किशानला 2016 च्या अंडर 19 क्रिकेट विश्वकप स्पर्धेत संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. या स्पर्धेत इशानने चांगली कामगिरी केली. या कामगिरीच्या आधारावरच इशानला 2016 साली आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. दोन वर्ष तो गुजरात लॉयन्स संघातून खेळला. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सकडून खेळू लागला.

संबंधित बातम्या :

मुंबईचा डाव सावरणाऱ्या इशानला सुपर ओव्हरमध्ये का पाठवलं नााही? रोहित शर्मा म्हणतो….

सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *