IPL 2020, QUALIFIER 2, DC vs SRH : दिल्ली आणि हैदराबादच्या कर्णधारांची प्ले ऑफमधील कामगिरी

क्वालिफायर 2 सामना जिंकणाऱ्या संघाची अंतिम सामन्यात मुंबईशी गाठ पडणार आहे.

IPL 2020, QUALIFIER 2, DC vs SRH : दिल्ली आणि हैदराबादच्या कर्णधारांची प्ले ऑफमधील कामगिरी

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील क्वालिफायर 2 सामना(Qualifier 2) आज (8 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळण्यात येणार आहे. ही मॅच अबुधाबीतील शेख झायेद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाचा सामना 10 नोव्हेंबरला मुंबई इंडियन्सशी फायलनमध्ये होणार आहे. या क्वालिफाय 2 च्या निमित्ताने आपण या दोन्ही संघाच्या कर्णधारांची प्ले ऑफमधील आतापर्यंतची कामगिरी पाहणार आहोत.

श्रेयस अय्यर( Shreyas Iyer) दिल्लीचा कर्णधार आहे. श्रेयस मागील 3 मोसमापासून आयपीएलमधील सर्वात युवा कर्णधार राहिला आहे. श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीने या वर्षी सलग दुसऱ्यांदा प्ले ऑफमध्ये धडक मारली. मागील मोसमात क्वालिफायर 2 मध्ये दिल्लीचा सामना चेन्नई सुपर किंग्जसविरुद्ध झाला होता. या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला. त्यामुळे यावेळेस हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारण्याचा दिल्लीचा प्रयत्न असणार आहे.

तर दुसऱ्या बाजूला हैदराबादने 2016 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावलं होत. यानंतर अनेकदा हैदराबादने अनेकदा प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. हैदराबादने 2018 मध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएलमधील यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. वॉर्नरने 2 वर्ष दिल्लीचेही प्रतिनिधित्व केलं आहे.

प्ले ऑफमधील कामगिरी

प्ले ऑफमधील कामगिरीच्या तुलनेत डेव्हिड वॉर्नर श्रेयस अय्यरला वरचढ आहे. वॉर्नरने 2016 मधील 3 बाद फेरीतील सामन्यात 190 धावा करत हैदराबादला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. आतापर्यंत वॉर्नरने प्ले ऑफमधील एकूण 7 सामन्यात 134.39 च्या स्ट्राईक रेटने 254 धावा केल्या.

तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यरला प्ले ऑफमध्ये विशेष कामगिरी करता आली नाहीये. आतापर्यंत श्रेयसने प्ले ऑफमधील एकूण 3 सामन्यात 91.67 च्या स्ट्राईक रेटने केवळ 33 धावाच केल्या आहेत. मागील मोसमातील प्ले ऑफमधील 2 सामन्यात श्रेयसने निराशाजनक कामगिरी केली होती. तर या मोसमातील क्लालिफायर 1 मध्ये मुंबईविरुद्ध 12 धावाच केल्या.

क्वालिफायर 1 चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळण्यात आला. यामध्ये मुंबईने दिल्लीचा पराभव केला. मात्र दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याने फायनल गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे. तसेच दिल्लीने साखळी फेरीतील 4 सामने सगल गमावले. साखळी फेरीत बंगळुरुचा पराभव करत प्ले ऑफचं तिकिटी कन्फर्म केलं. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादने सलग 4 सामने जिंकत क्वालिफाय 2 मध्ये धडक मारली आहे.

तसेच साखळी फेरीत हे दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने भिडले. या दोन्ही साखळी सामन्यात हैदराबादने दिल्लीचा पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 17 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 17 पैकी 11 सामन्यात हैदराबादने दिल्लीवर शानदार विजय मिळवला आहे. तर दिल्लीला 6 सामन्यात हैदराबादवर मात करता आली आहे. त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत हैदराबाद दिल्लीवर वरचढ आहे. मात्र या क्वालिफायर सामन्यात नक्की कोण कोणावर वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, Qualifier 2 : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो, Qualifier 2 सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : केन विल्यमसनची नाबाद अर्धशतकी खेळी, हैदराबादची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात, क्वालिफाय 2 सामन्यात दिल्लीविरुद्ध भिडणार

IPL 2020, QUALIFIER 2, DC vs SRH Live Update : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने, कोण गाठणार फायनल?

ipl 2020 qualifier 2 dc vs srh delhi capitals captain shreyas iyer and sunrisers hyderabad captain david warner performance in playoffs

Published On - 5:06 pm, Sun, 8 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI