AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, ‘सर जाडेजा इज ग्रेट…!’

"जाडेजाकडे क्षमता आहे. आज त्याने ती दाखवून दिली. मी त्याच्या बॅटिंग आणि बोलिंग परफॉर्मन्सने खूप खूश आहे., असं विराट कोहली म्हणाला. (IPL 2021 CSK vs RCB Virat kohli reaction on Allrounder Ravindra Jadeja Fantastic Batting)

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, 'सर जाडेजा इज ग्रेट...!'
विराट कोहली
| Updated on: Apr 26, 2021 | 7:07 AM
Share

मुंबई :  आयपीएलच्या14 पर्वातील 19 व्या सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखालील (MS Dhoni) चेन्नईने विराटसेनेचा (Virat Kohli) विजयरथ रोखला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) नावाच्या वादळात बंगळुरुची (Royal Challengers Banglore) टीम उन्मळून पडली. चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 69 धावांनी पराभव केला. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला या मोसमातील पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. कोहली भलेही हा सामना हरला परंतु त्याला दु:ख झालं नाही तर उलट त्याला आनंदच झाला आणि त्याच्या आनंदाचं कारण ठरला रवींद्र जडेजाचा बहारदार बॅटिंग परफॉर्मन्स…! जाडेजाने शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या शानदार फटकेबाजीमुळे विराट त्याच्यावर खूपच खूश आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकपवर विराटचं लक्ष आहे. त्याचदृष्टीने जाडेजाचा फॉर्म पाहता विराटचं टेन्शन दूर झालं आहे. (IPL 2021 CSK vs RCB Virat kohli reaction on Allrounder Ravindra Jadeja Fantastic Batting)

जाडेजाच्या बॅटिंग परफॉर्मन्सवर कोहली खूश

“जाडेजाकडे क्षमता आहे. आज त्याने ती दाखवून दिली. मी त्याच्या बॅटिंग आणि बोलिंग परफॉर्मन्सने खूप खूश आहे. दोन महिन्यांनंतर तो भारतीय संघाकडून खेळेल. जेव्हा तुमचा मुख्य अष्टपैलू फलंदाज उत्तम कामगिरी करत आहे हे पाहून तुम्हाला निश्चित आनंद होईल. साहजिक मलाही आनंद झालाय.”

जेव्हा तो चांगला खेळतो आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो, तेव्हा त्याला रोखणं कठीण असतं साहजिक संधीही जास्त मिळतात. जाडेजाच्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने मी खूप खूश आहे”, असं मॅच संपल्यानंतर कर्णधार कोहली म्हणाला.

जाडेजाची वादळी खेळी, हर्षल पटेलच्या एकाच ओव्हरमध्ये 37 धावा चोपल्या

सामन्यातील 20 वी ओव्हर बंगळुरुचा पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेल टाकायला आला. हर्षलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे हर्षलचा विश्वास दुणावलेला होता. मात्र जाडेजाने हर्षलचं सिक्सने स्वागत केलं. जाडेजाने सलग 4 सिक्स लगावले. जाडेजाने तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. मात्र हा नो बोल देण्यात आला.

त्यामुळे चेन्नईला 1 अतिरिक्त धाव मिळाली. जाडेजाने या पुढच्या चेंडूवर सलग चौथा सिक्स लगावला. यासह जाडेजाने तुफानी अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर जाडेजाने 2 धावा घेतल्या. त्यानंतर पुन्हा त्याने 5 वा सिक्स खेचला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर जाडेजाने चौकार लगावला. यासह जाडेजाने 28 चेंडूत 5 सिक्स आणि 4 चौकारांसह नाबाद 62 धावा ठोकल्या.

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील बंगळुरुचा पहिला पराभव

चेन्नविरुद्धच्या सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला. 20 व्या ओव्हरमध्ये मैदानात सर रविद्र जाडेजा नावाचं वादळ आलं. त्या वादळात बंगळुरुचा हर्षल पटेल उन्मळून पडला. जाडेजाने हर्षलने टाकलेल्या 20 व्या ओव्हरमध्ये 37 धावांची लयलूट केली. चेन्नईने बंगळुरुसमोर 192 धावांचं विशाल टार्गेट दिलं. विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर एबीडी आणि मॅक्सवेलने प्रयत्न केला. परंतु बंगळुरुला हे आव्हान पेलवलं नाही. अखेर 69 धावांनी चेन्नईने बंगळुरुवर मात केली.

(IPL 2021 CSK vs RCB Virat kohli reaction on Allrounder Ravindra Jadeja Fantastic Batting)

हे ही वाचा :

Ravindra Jadeja | ‘सर’ रवींद्र जाडेजाची वादळी खेळी, 20 व्या ओव्हरमध्ये चोपल्या 37 धावा, बंगळुरुला विजयासाठी 192 धावांचे आव्हान

IPL 2021 | ‘कॅप्टन कूल’ विराटसेनेचा विजयी रथ रोखणार, पाहा महेंद्रसिंह धोनी आणि 25 एप्रिलचं विजयी कनेक्शन

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.