IPL 2021 :  ‘जिसे डरते थे, वहीं बात हो गयी’, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला ‘डबल धक्का’!

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला चेन्नईविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर टाकल्याने रविवारी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (IPL 2021 Csk vs Rcb Royal Challengers Banglore lose Match Captain Virat kohli Fined Slow Over Rate)

IPL 2021 :  'जिसे डरते थे, वहीं बात हो गयी', चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला 'डबल धक्का'!
विराट कोहली

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 19 व्या सामन्यात यलो आर्मी चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) रेड आर्मी बंगळुरुवर (Royal Challengers Banglore) तुफानी विजय मिळवला. कॅप्टन कूलच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नईने विराटसेनेचा (Virat Kohli) विजयरथ रोखला त्याचबरोबर चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. विराटसेनेचा दारुण पराभव तर झालाच पण स्लो ओव्हर रेटचा (Slow Over Rate) दणकाही बसला. कर्णधार म्हणून विराटला स्लो ओव्हर रेटचा दंड भरावा लागणार आहे. त्याला 12 लाख रुपये भरावे लागणार आहे. प्रथम सामना गमावण्याची नामुष्की ओढावल्यानंतर आता स्लो ओव्हर रेटचा दंडही त्यावा भरावा लागणार असल्याने कोहलीला रविवारी डबल दणका बसला. (IPL 2021 Csk vs Rcb Royal Challengers Banglore lose Match Captain Virat kohli Fined Slow Over Rate)

विराट कोहलीला स्लो ओव्हर रेटचा दंड

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला चेन्नईविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर टाकल्याने रविवारी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल प्रेसच्या रिलीजनुसार आयपीएल आचारसंहितेच्या नियमानुसार स्लो ओव्हर टाकलेल्या संघाच्या कर्णधाराला स्लो ओव्हर रेट फाईन लागतो. त्यानुसार विराट कोहलीच्या बंगळुरुचा हा पहिला अपराध असल्याने कर्णधार म्हणून विराटला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बंगळुरुचा आयपीएलच्या 14 व्या पर्वातील पहिला पराभव

चेन्नविरुद्धच्या सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला. 20 व्या ओव्हरमध्ये मैदानात सर रविद्र जाडेजा नावाचं वादळ आलं. त्या वादळात बंगळुरुचा हर्षल पटेल उन्मळून पडला. जाडेजाने हर्षलने टाकलेल्या 20 व्या ओव्हरमध्ये 37 धावांची लयलूट केली. चेन्नईने बंगळुरुसमोर 192 धावांचं विशाल टार्गेट दिलं. विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर एबीडी आणि मॅक्सवेलने प्रयत्न केला. परंतु बंगळुरुला हे आव्हान पेलवलं नाही. अखेर 69 धावांनी चेन्नईला विजय मिळाला.

(IPL 2021 Csk vs Rcb Royal Challengers Banglore lose Match Captain Virat kohli Fined Slow Over Rate)

हे ही वाचा :

SRH vs DC, IPL 2021 Match 20 Result | सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची सनरायजर्स हैदराबादवर मात

Ravindra Jadeja | ‘सर’ रवींद्र जाडेजाची वादळी खेळी, 20 व्या ओव्हरमध्ये चोपल्या 37 धावा, बंगळुरुला विजयासाठी 192 धावांचे आव्हान

IPL 2021 | ‘कॅप्टन कूल’ विराटसेनेचा विजयी रथ रोखणार, पाहा महेंद्रसिंह धोनी आणि 25 एप्रिलचं विजयी कनेक्शन

Published On - 6:39 am, Mon, 26 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI