IPL 2021 : सलग 6 बॉलवर 6 चौकार खाल्ल्यानंतर शिवम मावीने दाबला पृथ्वी शॉ चा गळा!

पृथ्वीने डावाच्या पहिल्याच ओव्हर्समध्ये शिवम मावीला सलग 6 चौकार सीमापार धाडून आपले इरादे स्पष्ट केले होते. मॅच संपल्यानंतर कोलकाता आणि दिल्लीचे खेळाडू एकमेकांशी चर्चा करत असताना शिवम मावीने मस्करीने पृथ्वी शॉचा गळा दाबला (Shivam Mavi reaction After prithvi Shaw 6 Four)

IPL 2021 : सलग 6 बॉलवर 6 चौकार खाल्ल्यानंतर शिवम मावीने दाबला पृथ्वी शॉ चा गळा!
शिवम मावीने दाबला पृथ्वी शॉचा गळा...!
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 8:45 AM

अहमदाबाद :  नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियवर गुरुवारी पृथ्वी (Prithvi Shaw) नावाचं वादळ आलं. त्या वादळात कोलकात्याची टीम नेस्तनाबूत झाली. पृथ्वीने कोलकात्याविरुद्ध (DC vs KKR) फक्त 41 बॉलमध्ये धडाकेबाज 82 धावांची खेळी केली. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने कोलकात्याच्या बोलर्सला धुतलं. त्याने डावाच्या पहिल्याच ओव्हर्समध्ये शिवम मावीला सलग 6 चौकार सीमापार धाडून आपले इरादे स्पष्ट केले होते. मॅच संपल्यानंतर कोलकाता आणि दिल्लीचे खेळाडू एकमेकांशी चर्चा करत असताना शिवम मावीने मस्करीने पृथ्वी शॉचा गळा दाबला तसंच पृथ्वीच्या शानदार खेळीचं कौतुक केलं. (IPL 2021 Dc vs KKR Shivam Mavi reaction After prithvi Shaw 6 Four)

पृथ्वीने शिवमच्या 6 बॉलला दाखवल्या 6 जागा

पृथ्वीने सामन्यातील दुसऱ्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये 6 चेंडूत शानदार 6 चौकार चोपले. पृथ्वीने शिवम मावीच्या बोलिंगवर 6 चौकार लगावले. विजयी आव्हानाचे पाठलाग करायला दिल्ली मैदानात उतरली. पहिली ओव्हर शिवम मावी टाकायला आला. मावीने वाईड चेंडू टाकत डावाची खराब सुरुवात केली. त्यानंतर पृथ्वीने मावीच्या 6 चेंडूवर मैदानातील चारही कोपऱ्यात शानदार 6 चौकार लगावले.

पृथ्वी शॉ दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार

दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. कोलकाताने दिल्लीला विजयासाठी 155 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने 16.3 ओव्हरमध्ये 7 विकेट्स राखून पूर्ण केलं आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. पृथ्वीने 41 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने तब्बल 200.00 च्या स्ट्राईक रेटने दमदार 82 धावांची खेळी केली. पृथ्वीला शिखर धवनने उत्तम साथ दिली. शिखरने 46 धावांची खेळी केली.

शिवम मावीने दाबला पृथ्वीचा गळा

पृथ्वीने डावाच्या पहिल्याच ओव्हर्समध्ये शिवम मावीला सलग 6 चौकार सीमापार धाडून आपले इरादे स्पष्ट केले होते. मॅच संपल्यानंतर कोलकाता आणि दिल्लीचे खेळाडू एकमेकांशी चर्चा करत असताना शिवम मावीने मस्करीने पृथ्वी शॉचा गळा दाबला तसंच पृथ्वीच्या शानदार खेळीचं कौतुक केलं.

शिवम पृथ्वीची चांगली मैत्री

शिवम मावी आणि पृथ्वी शॉ चांगले मित्र आहे. दोघेही भारतीय संघाच्या अंडर 19 संघाचा भाग होते. 2018 साली भारतीय संघाने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली अंडर 19 वर्ल्डकप जिंकला होता, त्या संघाचा शिवम मावी हिस्सा होता. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवून करंडक जिंकला होता.

हे ही वाचा :

IPL 2021, Prithvi Shaw | पृथ्वी शॉचा धमाका, पहिल्याच ओव्हरच्या 6 चेंडूत फटकावले 6 चौकार

कॅप्टन कूल धोनीच्या आई वडिलांनी कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली, रुग्णालयातून डिस्चार्ज

IPL 2021 : चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने पत्नीला किस केलं, जहीर खानच्या बायकोने फोटो ट्विट केला अन्….

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.