AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : धडाकेबाज अर्धशतकानंतर बोटातली रिंग दाखवली, नितीशच्या सेलिब्रेशनमागे हे खास कारण!

अर्धशतकानंतर नितीश राणा याने आपल्या बोटातली रिंग सगळ्यांना दाखवली. त्याने त्याची ही खास खेळी आपली पत्नी मारवाहला समर्पित केली. (Nitish Rana Fifty Celebration Nitish Show His ring)

IPL 2021 : धडाकेबाज अर्धशतकानंतर बोटातली रिंग दाखवली, नितीशच्या सेलिब्रेशनमागे हे खास कारण!
नितीश राणाचं अर्धशतकानंतर खास सेलिब्रेशन...
| Updated on: Apr 12, 2021 | 9:10 AM
Share

चेन्नई : आयपीएल 2021 स्पर्धेतील (IPL 2021) तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hydrabad) 10 धावांनी पराभव केला. कोलकात्याने हैदराबादला विजयासाठी 188 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान हैदराबादच्या फलंदाजांना पेलवले नाही. निर्धारित 20 ओव्हरमध्ये हैदराबादच्या संघाने 5 बाद 177 धावा केल्या. कोलकात्याच्या विजयात महत्तपूर्ण भूमिका बजावली ती कोरोनातून सावरलेल्या योद्ध्याने… आक्रमक बॅट्समन नितीश राणा (Nitish Rana) याने… दमदार अर्धशतकानंतर त्याने खास सेलिब्रेशनही केलं. आपल्या बोटातली रिंग दाखवत त्याने खास व्यक्तीला ही खेळी समर्पित केली. (IPL 2021 KKR vs SH Nitish Rana Fifty Celebration Nitish Show His ring)

अर्धशतकानंतर त्याने बोटातली रिंग दा दाखवली…?

या सामन्यात नितीश राणाने 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याचं हे आयपीएलमधील 12 वं अर्धशतक ठरलं. अर्धशतकानंतर नितीश राणा याने आपल्या बोटातली रिंग सगळ्यांना दाखवली. त्याने त्याची ही खास खेळी आपली पत्नी मारवाहला समर्पित केली. आपल्या हातातील ग्लोव्ह्ज काढत एक हाताने त्याने रिंग दाखवली.

नितीशची कोरोनावर मात

आयपीएल सुरु होण्याअगोदर त्याला कोरोनाने गाठलं होतं. परंतु त्याने काहीच दिवसांत कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली तसंच क्रिकेटच्या मैदानात उतरुन कोलकात्याला विजयी सलामी देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

केकेआर विरुद्ध एसआरएच सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून कोलकात्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. या सामन्यात कोलकात्याचा सलामीवीर नितीश राणाने 56 चेंडूत 80 धावांची खेळी करत कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. या खेळीत त्याने उत्तुंग 4 षटकार खेचले. कोरोनावर मात करताच त्याने धमाकेदार इनिंग साकारली.

नितीश राणाने रचला पाया, कोलकात्याच्या गोलंदाजांनी चढविला कळल

नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीने खेळलेल्या झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादला 188 धावांचे आव्हान दिले. केकेआरच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत या आव्हानाचा बचाव केला. त्यातही प्रामुख्याने शेवटच्या षटकात आंद्रे रसेलने केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे हैदराबादला विजयी आव्हान पूर्ण करता आले नाही. अखेर कोलकात्याने हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला. कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन तर शाकीब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

(IPL 2021 KKR vs SH Nitish Rana Fifty Celebration Nitish Show His ring)

हे ही वाचा :

IPL 2021 : राशीद खानच्या फिरकीची जादू, शुभमन क्लिन बोल्ड, रसेलला पॅव्हेलियनचा रस्ता, ही आनंदाने नाचणारी मुलगी कोण?

IPL 2021 : कोरोनातून योद्धा सावरला, हैदराबादच्या बोलर्सला फोडून काढलं, नितीश राणाच्या खेळीने कोलकात्याचा शानदार विजय

IPL 2021 : पृथ्वीचं तडाखेबाज अर्धशतक, बॅटची जादू पाहून गर्लफ्रेंड भलतीच खूश झाली, म्हणाली….

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.