AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : पहिल्याच मॅचमध्ये विराट कोहलीला दुखापत, क्रुणाल पांड्याचा बॉल विराटच्या डोळ्यावर

पहिल्याच सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला दुखापत झाली. मुंबईचा आक्रमक फलंदाज क्रुणाल पांड्याने (krunal Pandya) मारलेला बॉल थेट विराट कोहलीच्या डोळ्यावर जाऊन आदळला. | IPL 2021 MI vs RCB Virat kohli Injured Krunal Pandya Shot

IPL 2021 : पहिल्याच मॅचमध्ये विराट कोहलीला दुखापत, क्रुणाल पांड्याचा बॉल विराटच्या डोळ्यावर
विराट कोहलीला दुखापत...
| Updated on: Apr 10, 2021 | 9:21 AM
Share

चेन्नई :  विराट कोहलीच्या (Virat kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) विजयी सलामी दिली. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. शेवटच्या चेंडूवर मुंबईने विजय संपादन केला. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बंगळुरुने 8 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण केलं. तत्पूर्वी पहिल्याच सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला दुखापत झाली. मुंबईचा आक्रमक फलंदाज क्रुणाल पांड्याने (krunal Pandya) मारलेला बॉल थेट विराट कोहलीच्या डोळ्यावर जाऊन आदळला. त्यामुळे कोहलीला दुखापत झाली आहे. (IPL 2021 MI vs RCB Virat kohli Injured Krunal Pandya Shot)

क्रुणालचा जोराचा फटका, विराट कोहलीला दुखापत

आरसीबीने प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या डावाच्या 19 व्या ओव्हरमध्ये आरसीबीचा गोलंदाज कायल जॅमिसन बोलिंग मार्कवर आला. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर क्रुणाल पांड्याने आक्रमक शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने जोराचा फटका मारला पण तो बॉल विराट कोहलीच्या डोळ्याच्या खालच्या भागावर लागला. विराट कोहली झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ही दुखापत झाली. कोहलीकडून झेल तर सुटला मात्र फटका एवढा ताकदवान होता की हाताला लागूनही बॉलने डोळ्याच्या खाली मोठी दुखापत केली.

दुखापत झाल्यानंतरही सलामीला येऊन फटकेबाजी

कोहलीच्या डोळ्याखाली बॉल लागलेला व्रण दिसत होता. त्याचा डोळा दुखापतीमुळे लालसर पडला होता. परंतु अशाही परिस्थितीत त्याने मुंबईविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये सलामीला येऊन नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. ज्यामुळे आरसीबीला विजय मिळवणं शक्य झालं. दुखापत होऊनही त्याने आरसीबीच्या विजयात खारीचा वाटा उचलला.

हर्षल पटेल पुढे मुंबईकरांनी गुडघे टेकले

आरसीबीच्या हर्षल पटेल पुढे मुंबईकर फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. मुंबईविरोधात एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा हर्षल पटेल जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. 14 वर्षांच्या आयपीएल इतिहासात अशी कामगिरी कोणत्याही गोलंदाजाला करता आलेली नाही. त्याने  4 षटकात 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे मुंबईचे सर्वांत आक्रमक फलंदाज इशान किशान, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, केरॉन पोलार्ड यांसारख्या बिग हिटरला त्याने तंबूत धाडलं.

(IPL 2021 MI vs RCB Virat kohli Injured Krunal Pandya Shot)

हे ही वाचा :

IPL 2021 : लग्नानंतरची नवऱ्याची पहिली मॅच, अँकरिंग करताना अंगावर निळा ड्रेस, बुमराहच्या पत्नीचा अनोखा ‘प्रेमाचा अंदाज!’

IPL 2021 : सिडनीच्या या व्हायरल कपलचा सपोर्ट कुणाला, MI की RCB? त्यांची टीम हरली की जिंकली? पुढे काय झालंय तुम्हीच पाहा

IPL 2021 : हर्षल पटेलची हॅट्रिक हुकली पण मुंबईविरुद्ध कुणालाही जमली नाही अशी कामगिरी करुन दाखवली!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.