IPL 2021 : नाद करा पण माझा कुठं?, रैना-कोहलीला पछाडत रोहित शर्माचा ऐतिहासिक रेकॉर्ड!

पंजाबविरुद्धच्या सामन्यात शुक्रवारी रात्री बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या रोहितच्या नावे 200 डावांत बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून विक्रम नोंदवला गेला. त्याने पंजाबविरुद्ध खेळताना 200 व्या डावात फलंदाजी केली. (IPL 2021 Mumbai Indians Rohit Sharma Became First Batsman To play 200 inning In IPl History)

IPL 2021 : नाद करा पण माझा कुठं?, रैना-कोहलीला पछाडत रोहित शर्माचा ऐतिहासिक रेकॉर्ड!
रोहित शर्मा

मुंबई : पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबईला इंडियन्सला (Mumbai Indians vs Punjab Kings) पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या 14 व्या पर्वात (IPL 2021) मुंबईने आतापर्यंत 5 सामने खेळले. त्यापैकी मुंबईला 3 सामन्यांत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. असं असलं तरी मुंबईचा संघनायक रोहित शर्मा (Rohit Sharma) तुफान फॉर्मात आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात बॅटिंगला मैदानात उतरल्याबरोबर रोहितने खास विक्रम आपल्या नावे केला. (IPL 2021 Mumbai Indians Rohit Sharma Became First Batsman To play 200 inning In IPl History)

रोहित शर्माचा दमदार रेकॉर्ड

रोहित शर्माने आयपीएलच्या अनेक पर्वांमध्ये विविध रेकॉर्ड्स केलेत. सर्वाधिक पर्वांचं विजेतेपद मिळवणाऱ्या संघनायकांमध्ये रोहित शर्माचा हात कोणताही संघनायक धरु शकणार नाही. त्याने मुंबईला आतापर्यंत 5 करडंक जिंकून दिलेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यात शुक्रवारी रात्री बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या रोहितच्या नावे 200 डावांत बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून विक्रम नोंदवला गेला. त्याने पंजाबविरुद्ध खेळताना 200 व्या डावात फलंदाजी केली. असा कारनामा आणखी कोणत्याही फलंदाजाला जमला नाहीय.

कोहली रैनाला पछाडलं

रोहित शर्माने विराट कोहली आणि सुरेश रैनाला देखील पाठीमागे टाकलं आहे. रोहितनंतर सर्वाधिक डावांत फलंदाजी करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 192 डावांत फलंदाजी केली आहे. रैनानंतर विराटचा क्रमांक लागतो. त्याने आतापर्यंत 188 डावांत फलंदाजी केली आहे. म्हणजेच सगळ्या फलंदाजांपैकी रोहित एक पाऊल पुढे आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 200 व्या डावांत फलंदाजी केली. या सामन्यात त्याने झुंजार अर्धशतक झळकावलं.

मुंबईला पाचव्यांदा जेतेपद मिळवून देणारा कर्णधार

मुंबईला पाचव्यांदा जेतेपद मिळवून देणारा कर्णधार म्हणून खास विक्रम रोहित शर्माच्या नावे नोंद आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे. मुंबईनंतर चेन्नईचा नंबर लागतो. धोनीने चेन्नईला 3 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे.

(IPL 2021 Mumbai Indians Rohit Sharma Became First Batsman To play 200 inning In IPl History)

हे ही वाचा :

IPL 2021 : इशान किशनला झालंय तरी काय?, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली शाळा!

VIDEO | ख्रिस गेलचे गगनचुंबी षटकार पाहून कोच जॉन्टी ऱ्होड्सची जबरदस्त रिअ‍ॅक्शन

PBKS vs MI, IPL 2021 Match 17 Result | केएल राहुलची नाबाद अर्धशतकी खेळी, पंजाबचा मुंबईवर 9 विकेट्ने शानदार विजय

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI