IPL 2021: अब्दुल समदच्या षटकारांनी डेव्हिड वॉर्नरला अत्यानंद, कर्णधाराकडून थाबासकीची थाप, पाहा व्हिडीओ

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अब्दुल समदने पॅट कमिन्स सारख्या गोलंदाजाला दोन गगनचुंबी षटकार लगावले. हे पाहून डेव्हिड वॉर्नरही हैरान झाले. त्याने टाळ्या वाजवून अब्दुलला शाबासकीची थाप दिली. | Abdul Samad hit 2 Sixes David Warner reaction

IPL 2021: अब्दुल समदच्या षटकारांनी डेव्हिड वॉर्नरला अत्यानंद, कर्णधाराकडून थाबासकीची थाप, पाहा व्हिडीओ
अब्दुल समदच्या षटकारांनी डेव्हिड वॉर्नरला अत्यानंद...
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 11:03 AM

चेन्नई : आयपीएल 2021 स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) हा तिसरा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidabaram Stadium) खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकात्याने हैदराबादवर 10 धावांनी मात केली. सामन्यादरम्यान हैदराबादला जेव्हा कमी चेंडूत अधिक धावांची गरज होती तेव्हा हैदराबादच्या अब्दुल समदने (Abdul Samad) आपल्या बॅटची ताकद दाखवली. त्याने 15 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) चेंडूला स्टेडियमच्या बाहेर धाडलं. त्याने दोन उत्तुंग षटकार खेचले. हे पाहून डगआऊटमध्ये बसलेला हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला अत्यानंद झाला. त्याने टाळ्या वाजवून समदचं अभिनंदन केलं. (IPL 2021 SRH vs KKR Abdul Samad hit 2 Sixes David Warner reaction)

अब्दुल समदच्या बॅटमधून दोन तडाखेबाज सिक्सेस

हैदराबादची टीम कोलकात्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत होती. हैदराबादच्या डावाची सुरुवात अतिषय खराब झाली. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये हैदराबादचे सलामीवीर तंबूत परतले होते. मग मनीष पांडे आणि जॉनी बेअरस्टो यांनी आक्रमक खेळी करुन हैदराबादला विजयाची स्वप्न दाखवली. पण विजय दृष्टीक्षेपात असताना दोघेही आऊट झाले. साहजिक कुणीतरी दुसऱ्या बॅट्समनने येऊन फटकेबाजी करणं गरजेचं होतं. ही कमी अब्दुल समदने भरुन काढली. हैदराबादच्या डावाच्या 19 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर अब्दुल समदने लेगसाईडला एक उत्तुंग षटकार ठोकला. तो षटकार एवढा लांब होता की बॉलरही पाहत राहिला. 93 मीटर्सचा तो षटकार होता.

पुन्हा दुसऱ्या बॉलवर यॉर्कर बॉल असताना देखील त्याने बॉलला खणून काढत सीमारेषेपलीकडे पाठवलं. हा षटकार तर पाहण्याजोगा होता. 15 कोटींच्या पॅट कमिन्सला 19 वर्षीय अब्दुल समदने आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली.

हैरान वॉर्नरकडून टाळ्या वाजवून समदचं अभिनंदन

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अब्दुल समदने पॅट कमिन्स सारख्या गोलंदाजाला दोन गगनचुंबी षटकार लगावले. हे पाहून डेव्हिड वॉर्नरही हैरान झाले. त्याने टाळ्या वाजवून अब्दुलला शाबासकीची थाप दिली.

पाठीमागच्या मोसमात आयपीएल 2020 मध्ये केकेआरने 15 कोटी रुपयांना खरेदी करुन आपल्या संघात सामिल करुन घेतलं. कमिन्स जगातल्या घातक गोलंदाजांपैकी एक मानला जातो. परंतु त्याच्याही बॉलवर उत्तुंग षटकार मारत समदने ताकद दाखवून दिली.

(IPL 2021 SRH vs KKR Abdul Samad hit 2 Sixes David Warner reaction)

हे ही वाचा :

IPL 2021 : 2 वर्षानंतर मैदानात, केवळ 6 बॉल टाकले, वॉर्नरला चकवलं, तरीही हरभजनला फक्त एकच ओव्हर का?

IPL 2021 : धडाकेबाज अर्धशतकानंतर बोटातली रिंग दाखवली, नितीशच्या सेलिब्रेशनमागे हे खास कारण!

IPL 2021 : राशीद खानच्या फिरकीची जादू, शुभमन क्लिन बोल्ड, रसेलला पॅव्हेलियनचा रस्ता, ही आनंदाने नाचणारी मुलगी कोण?

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.