AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : विराट कोहलीला ओपनिंगवरुन हटवा आणि ‘या’ खेळाडूला पाठवा, वीरेंद्र सेहवागचा बंगळुरुला सल्ला

भारताचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने बंगळुरु संघाला खास सल्ला दिला आहे. "विराटने त्याच्या तीन नंबरच्या पोझिशनवर खेळायला यायला हवं. तसंच बंगळुरुच्या संघाने सलामीला मोहम्मद अझरुद्दीनला पाठवायला हवं, असा सल्ला त्याने दिलाय. (IPL 2021 Virendra Sehwag Advice RCB)

IPL 2021 : विराट कोहलीला ओपनिंगवरुन हटवा आणि 'या' खेळाडूला पाठवा, वीरेंद्र सेहवागचा बंगळुरुला सल्ला
वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली
| Updated on: May 02, 2021 | 12:58 PM
Share

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील बंगळुरु (RCB) संघाने कमाल केली. पहिल्या चारही सामन्यांत त्यांनी दणदणीत विजय मिळवून स्पर्धेची धडाक्यात सुरुवात केली. मात्र गेल्या सामन्यांत त्यांना कुणाची नजर लागली की काय, असा प्रश्न आरसीबीच्या चाहत्यांना पडला आहे. पाठीमागच्या दोन सामन्यांत आरसीबीला पराभवाचा तोंड पाहावं लागलं आहे. स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या पंजाबने (PBKS) आरसीबीला 34 धावांनी पराभूत केलं. बंगळुरुची टीम पुन्हा एकदा टीकेची धनी बनली आहे. अशातच भारताचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) बंगळुरु संघाला खास सल्ला दिला आहे.  (IPL 2021 Virendra Sehwag Advice RCB Virat kohli Should Bat At no 3 Mohammed Azharuddeen Should Open)

वीरेंद्र सेहवागने बंगळुरुला काय सल्ला दिलाय?

आयपीएलच्या 14 व्या पर्वात विराट कोहली बंगळुरुच्या डावाची सुरुवात करतोय. परंतु सलामीला येऊन त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीयत. पॉवरप्लेमध्येच तो तंबूत परत जातोय. अशा परिस्थितीत “विराटने त्याच्या तीन नंबरच्या पोझिशनवर खेळायला यायला हवं. तसंच बंगळुरुच्या संघाने सलामीला मोहम्मद अझरुद्दीनला पाठवायला हवं. सध्यातरी रजत पाटीदारच्या तुलनेत मोहम्मद अझरुद्दीन हा खूप चांगला पर्याय आहे. कोहलीने तिसऱ्या नंबरवरच खेळायला हवं. त्याच्यानंतर मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्स ही जोडी आहेच…”, असा खास सल्ला वीरेंद्र सेहवागने बंगळुरुला दिला आहे.

डावाची सुरुवात जर देवदत्त पडीक्कल आणि अझरुद्दीनने केली तर आरसीबीला फायदा होऊ शकतो आणि जर ही सलामी जोडी अपयशी ठरली तर त्याच्यानंतर विराट, मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्सच्या रुपात बंगळुरुकडे क्लास प्लेअर्स आहेत, असं सेहवागने म्हटलं आहे.

सलामीला येऊन विराटच्या बॅटमधून धावा नाहीत

आयपीएल 2021 मोसमाच्या अगोदरच विराट कोहलीने जाहीर केलं होतं की तो बंगळुरुच्या डावाची सुरुवात करेल. आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांत त्याने डावाची सुरुवात केली आहे मात्र त्यांच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. सलामीला येऊन तो सपशेल अपयशी ठरलाय. केवळ राजस्थान रॉयल्सविरुद्धचं अर्धशतक वगळता त्याला खास कामगिरी करण्यात अपयश आलंय.

(IPL 2021 Virendra Sehwag Advice RCB Virat kohli Should Bat At no 3 Mohammed Azharuddeen Should Open)

हे ही वाचा :

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदावरुन उचलबांगडी, फॅन्स संतापले, हैदराबादला इतिहासाची आठवण करुन दिली!

IPL 2021 : रोहितच्या पलटणने आस्मान दाखवलं, मॅच चेन्नईच्या हातून कधी निसटली? धोनीने सांगितला नेमका ‘तो’ क्षण!

IPL 2021, MI vs CSK | वादळी खेळीसह पोलार्डचा विक्रम, मुंबईची ऐतिहासिक कामगिरी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.