MS Dhoni च्या जोरावर CSK चा IPL मध्ये जबरा रेकॉर्ड, शेवटच्या चेंडूवर जिंकणारी एक्स्पर्ट टीम

MS Dhoni च्या जोरावर CSK चा IPL मध्ये जबरा रेकॉर्ड, शेवटच्या चेंडूवर जिंकणारी एक्स्पर्ट टीम

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सचा पराभव करून आपला दुसरा विजय नोंदवला. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर यलो आर्मीने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा तीन गडी राखून पराभव केला.

अक्षय चोरगे

|

Apr 22, 2022 | 11:27 AM

मुंबई : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सचा पराभव करून आपला दुसरा विजय नोंदवला. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर यलो आर्मीने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा तीन गडी राखून पराभव केला. चेन्नईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. यासह या संघाने आयपीएलमध्ये शेवटच्या चेंडूवर सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम केला. 21 एप्रिल रोजी खेळवण्यात आलेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) उत्कृष्ट फलंदाजीमुळे चेन्नईने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. धोनीने चौकार मारून संघाला लक्ष्याच्या पलीकडे नेलं. चेन्नईला 20 व्या षटकात विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती. त्यापैकी 16 धावा धोनीने 16 फटकावल्या.

या विजयासह चेन्नई सुपर किंग्जने आठव्यांदा लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या यादीत चेन्नईनंतर मुंबईचे नाव येते. पाच वेळा चॅम्पियन संघाने शेवटच्या चेंडूवर सहा वेळा सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबईने पाच वेळा तर चेन्नईने चार वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. आयपीएलमध्ये जेव्हा जेव्हा या दोन संघांची टक्कर झाली त्या प्रत्येक सामन्यात भरपूर मनोरंजन झाले आहे.

धोनीने तिसऱ्यांदा शेवटच्या षटकात 15 पेक्षा जास्त धावा केल्या

धोनीने मुंबईविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चार चेंडूत 16 धावा करून आणखी एक चमत्कार घडवला. शेवटच्या षटकात 15 हून अधिक धावा फटकावत त्याने आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने मुंबईपूर्वी 2016 आणि 2010 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध हा पराक्रम केला होता. 2016 मध्ये त्याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर 22 आणि 2010 मध्ये इरफान पठाणच्या षटकात 18 धावा वसूल केल्या होत्या. योगायोगाने, धोनीने तिन्ही वेळा डावखुऱ्या गोलंदाजांसमोर शेवटच्या षटकात 15 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

मुंबईच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील ही लढत खूपच रंगतदार ठरली. या सामन्याने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सात बाद 155 धावा केल्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय नोंदवला. महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला. दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सने सलग 7 वा पराभव पत्करला. या पराभवासह मुंबईच्या प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मुंबई इंडियन्स प्रमाणे चेन्नई सुपर किंग्सचा संघही या सीजनमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करतोय. त्यांचा सात सामन्यातील हा दुसरा विजय आहे. त्यांचे प्लेऑफमधील आव्हान अद्यापही टिकून आहे.

इतर बातम्या

MI vs CSK IPL 2022: अरेरे, Rohit Sharma च्या नावावर IPL मधल्या सर्वात खराब रेकॉर्डची नोंद

MI vs CSK IPL 2022: इशान किशन खाली पडला, मुकेश चौधरीच्या जबरदस्त यॉर्करवर विकेट, Watch VIDEO

IPL 2022: CSK ला आणखी एक मोठा झटका, दीपक चाहर पाठोपाठ आणखी एक गोलंदाज बाहेर, नव्या ‘मलिंगा’चा संघात समावेश

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें