Video : अरे रे…! नाणेफेकीवेळी रवि शास्त्री यांनी केली अशी चूक, हार्दिक पांड्याला आलं हसू

रवि शास्त्री हे उत्तम समालोचक आहेत. त्यांचा भारदस्त आवाज सामना पाहताना कानात घुमत असतो. पण त्यांनी आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात चूक केली आणि ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

Video : अरे रे...! नाणेफेकीवेळी रवि शास्त्री यांनी केली अशी चूक, हार्दिक पांड्याला आलं हसू
Video : अरे रे...! नाणेफेकीवेळी रवि शास्त्री यांनी केली अशी चूक, हार्दिक पांड्याला आलं हसूImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 9:43 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. जेतेपदासाठी दहा संघ मैदानात आहेत. स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरु आहे. गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घतेला. पण नाणेफेकीच्या वेळी समालोचक रवि शास्त्री यांनी एक चूक केली. त्यामुळे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला हसू आवरता आलं नाही. कारण वुमन्स प्रीमियर लीगचं भूत अजून डोक्यातून गेलं नसल्याचं दिसत आहे. त्याच्या चुकीच्या व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नाणेफेकीसाठी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात होते. पण नेमका यावेळी रवि शास्त्री यांना नावाचा घोळ घातला.  नावात काय ठेवलं आहे असं म्हणतात. पण एका चुकीमुळे मोठी गडबड होऊ शकते. रवि शास्त्री यांनी मोठ्या दिमाखात गुजरात टायटन्सचं नाव गुजरात जायन्ट्स घेतलं. त्यामुळे हार्दिक पांड्या सुरुवातील बुचकळ्यात पडला त्यानंतर हसू लागला.

वुमन्स प्रीमियर लीगमधील गुजरात संघाचं नाव गुजरात जायन्ट्स असं आहे. तर आयपीएलमधील गुजरात संघाचं नाव गुजरात टायटन्स असं आहे. त्यामुळे दोन्ही नावं जवळपास सारखीच असल्याने घोळ झाला. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायन्ट्सची कामगिरी सुमार ठरली होती. आठ पैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आला होता. त्यामुळे गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. तर गुजरात टायटन्स पदार्पणाच्या सामन्यातच जेतेपदावर नाव कोरलं होतं.

चेन्नईचा डाव

चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 178 धावा केल्या आणि विजयासाठई 179 धावांचं आव्हान दिलं. पहिल्याच सामन्यात ऋतुराज गायकवाडनं दमदार फलंदाजी केली. त्याने 50 चेंडूत 92 धावांची खेळी केली. यात 4 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता.

दोन्ही संघाचे खेळाडू

चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.

गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.