AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : केकेआर आणि आरसीबीचा वाद भोवला, एबी डिविलियर्सला पत्नीनं सोडलं Watch Video

घरी पती पत्नीमध्ये सामना पाहण्यावरून वाद झाल्याचं चित्र तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण क्रिकेटपटू एबी डिविलियर्स आणि त्याची पत्नी यांच्यात आयपीएल संघावरून वाद झाल्याचं पाहायला मिळाल. कोणता संघ आवडता असा प्रश्न विचारल्यावर दोघांची उत्तर वेगवेगळी होती.

IPL 2023 : केकेआर आणि आरसीबीचा वाद भोवला, एबी डिविलियर्सला पत्नीनं सोडलं Watch Video
IPL 2023 : केकेआर आणि आरसीबीचा वाद भोवला, एबी डिविलियर्सला पत्नीनं सोडलं Watch VideoImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2023 | 10:43 PM
Share

मुंबई : मिस्टर 360 नावाने क्रिकेट जगतात एबी डिविलियर्स ओळखला जातो. एबी डिविलियर्स सध्या आयपीएलमध्ये नाही, तरी त्याच्या नावाची जादू आजही कायम आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एबी डिविलियर्स खेळला आहे. त्यामुळे त्याचं आयपीएमधील पहिलं प्रेम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच आहे. त्यामुळे त्याचं आणि त्याच्या पत्नीचा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच काय तर त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याचं देखील पाहायला मिळालं. एबी डिविलियर्सला तिच्याकडे पाहण्यापलीकडे काहीच पर्याय उरला नव्हता. दोघांचा वाद कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवरून झाला. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कार्यक्रमात दोघांना आयपीएल 2023 स्पर्धेत कोणत्या संघाला सपोर्ट करता असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा एबी डिविलियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नाव घेतलं. डिविलियर्स या संघाकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आरसीबीकडून त्याचा समावेश हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला होता. दुसरीकडे त्याच्या पत्नीने कोलकाता नाइट रायडर्सचं नाव घेतलं.

आयपीएलच्या अधिकृत डिजिटल ब्रॉडकास्टर प्लॅटफॉर्मवर क्विक फायर राउंड दरम्यान हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी एबी डिविलियर्सची पत्नी डॅनियलने केकेआरला सपोर्ट करणअयाचं कारणंही सांगितलं. “केकेआर शाहरुख खानची टीम आहे.” तिचं हे उत्तर ऐकून आरबीसीच्या माजी खेळाडूने सांगितलं की, काय मस्करी करते? त्यानंतर डॅनियल डिविलियर्स सोडून शोमधून निघून गेली.

एबी डिविलियर्सच्या अंदाजानुसार यंदा आयपीएलचा किताब गुजरात टायटन्स जिंकेल. आयपीएल 2022 चा किताब हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातनं जिंकला होता. असं असलं तरी या संघात जेतेपद पुन्हा जिंकण्याची ताकद असल्याचं त्याने सांगितलं आहे. “मला मनापासून वाटतं की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने किताब जिंकावा. मागच्या वर्षीही आमच्याकडे चांगली टीम होती. पण आम्ही हारलो होतो.”

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सर्वोत्तम Playing XI : फाफ डु प्लेसी (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोड़, हर्षल पटेल, वानिंदु हसारंगा, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड.

बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.