IPL Retention 2025: आयपीएल टीमचा ‘मेड इन इंडिया’चा मंत्र, 20 कोटींवर प्रथमच तीन भारतीय, वाचा A to Z माहिती

IPL 2025 Auction Team: यंदाच्या आयपीएल लिलावात गुजरात आणि मुंबई दोन संघ मजबूत झालेले दिसत आहे. गुजरातने गोलंदाजी आक्रमक करण्यावर भर दिला. त्यासाठी त्यांनी कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, राशिद खान यांना घेतले. कर्णधार म्हणून शुभमन गिल आहे.

IPL Retention 2025: आयपीएल टीमचा 'मेड इन इंडिया'चा मंत्र, 20 कोटींवर प्रथमच तीन भारतीय, वाचा A to Z माहिती
IPL
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 6:08 PM

IPL 2025 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अठराव्या हंगामासाठी दोन दिवसीय मेगा ऑक्शन पार पडले. यंदाच्या या लिलावात अनेक नवीन विक्रम झाले आहेत. या लिलावात इतिहास रचला गेला. २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये झालेल्या लिलावात १० संघांनी ६३९.१५ कोटी रुपये खर्च करुन एकूण १८२ खेळाडूंना घेतले. दहा बड्या खेळाडूंना कुणीच घेतले नाही. परंतु १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याला १.१० कोटींमध्ये राजस्थान संघाने घेतले. आयपीएलमध्ये खेळणारा वैभव हा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या संघाने घेतले. पहिल्या दिवशी तो विकला गेला नव्हता. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त बोलीसुद्धा यंदाच लावण्यात आली. ऋषभ पंत सर्वात महाग खेळाडू ठरला. त्याला २७ कोटी रुपयांत लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने घेतले. ६ फूट ३ इंच उंच खेळाडूही यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहे. गुरजपनीत सिंह याला चेन्नई सुपर किंग्सने २.२० कोटींत घेतले.

भारतीय खेळाडूंना मिळाला भाव

आयपीएलचे आतापर्यंत १७ सीजन झाले आहेत. परंतु एकाही हंगामात भारतीय खेळाडूस २० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली नाही. प्रथमच तीन भारतीयांना यावर्षी २० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क याला २४.७५ कोटी रुपये मिळाले होते. पॅट कमिंस याला २०.५० कोटी मिळाले होते. भारतीय खेळाडूंमध्ये यापूर्वी सर्वाधिक रक्कम २०१५ मध्ये युवराज सिंह याला मिळाली होती. ती १६ कोटी रुपये होती. आयपीएलमधील दहा संघांकडे ६४१.५ कोटी रुपये होते. त्यात पहिल्या दिवशी ७२ खेळाडूंवर ४६७.९५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या लिलावात सर्वच संघानी भारतीय खेळाडूंवर विश्वास दाखवत ‘मेड इन इंडिया’चा मंत्र दिला. यंदा कोण कोणत्या संघाने त्यांच्या संघातील सर्वात महाग खेळाडू घेतले पाहू या…

संघ खेळाडू किंमत
एलएसजी ऋषभ पंत २७ कोटी
पीबीकेएस श्रेयस अय्यर २६.७५ कोटी
केकेआर व्यंकटेश अय्यर २३.७५ कोटी
जीटी जोस बटलर १५.७५ कोटी
डीसी केएल राहुल १४ कोटी
आरआर जोफ्रा आर्चर १२.५० कोटी
आरसीबी जोश हेजलवूड १२.५० कोटी
एमआय ट्रेंट बोल्ट १२.५० कोटी
एसआरएच ईशान किशन ११.२५ कोटी
सीएसके नूर अहमद १० कोटी
हे सुद्धा वाचा

आयपीएलच्या इतिहासात सर्वात महाग खेळाडू

आयपीएलच्या इतिहासात सर्वात महाग तीन खेळाडू यंदाच्या हंगामात खेळणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही खेळाडू भारतीय आहे. त्यात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर यांचा समावेश आहे.

खेळाडू रक्कम वर्ष
ऋषभ पंत २७ कोटी २०२५
श्रेयस अय्यर २६.७५ कोटी २०२५
मिचेल स्टार्क २४.७५ कोटी २०२४
व्यंकटेश अय्यर २३.७५ कोटी २०२५

ऋषभ पंत का बनला सर्वात महाग खेळाडू

ऋषभ पंत धुवांधार फलंदाज आहे. तसेच देशीतील अव्वल विकेटकीपर आहे. आयपीएल लिलावात २७ कोटींची विक्रमी रक्कम मिळवून ऋषभ पंतने नवीन विक्रम केला होतो. आतापर्यंत इतकी रक्कम कोणालाही मिळाली नाही. ऋषभला इतकी रक्कम का मिळाली? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. ऋषभ दिल्लीकडून खेळला असला तरी उत्तर प्रदेशातील आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला उत्तर प्रदेशातील खेळाडू कर्णधार हवा होता. तसेच ऋषभ पंतमध्ये एकहाती सामना फिरवण्याची ताकद आहे. विकेटकीपर म्हणून महेंद्रसिंह धोनीनंतर सर्वात श्रेष्ठ भारतीय विकेटकीपर तो ठरला आहे.

ऋषभ पंतच्या खरेदीवर संघ मालक म्हणतात…

लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका ऋषभ पंतसंदर्भात म्हणतात, ऋषभ पंत हा संघाच्या योजनेचा भाग होता. आम्ही त्याला खरेदी करण्याची योजना बनवली होती. त्याच्यासाठी २६ कोटी रुपये निश्चित केले होते. परंतु २७ कोटी ही थोडी जास्त रक्कम दिली. ऋषभचा समावेश होणे जास्त महत्वाचे आहे. संघाच्या चाहत्यांनाही त्यामुळे आनंद मिळणार आहे.

१३ वर्षीय वैभव सूर्यवंशी ठरला आकर्षण

बिहारमधील १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आयपीएल लिलावातील आकर्षण ठरला. त्याला राजस्थान रॉयल्सच्या संघाने १.१० कोटी रुपयांत घेतले. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयाचा खेळाडू वैभव ठरला आहे. त्याची बेस प्राइस ३० लाखांपासून होती. राजस्थान रायल्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघांनी त्याच्यासाठी बोली लावली. अखेर राजस्थानच्या संघाने त्याला घेतले. वैभव १३ वर्ष २४३ दिवसांचा आहे. तो अंडर १९ मध्ये भारतीय संघात खेळला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने ५८ चेंडूत शतक करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. वयाच्या १२ व्या वर्षी त्याने रणजीत ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी हेच त्याचे प्रशिक्षक आहे. ते सुद्धा क्रिकेटर होते. राष्ट्रीय संघात समावेश न झाल्यामुळे त्यांनी कोचिंग देणे सुरु केले. लिलावानंतर वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी भावूक झाले. ते म्हणाले, वैभव दहा वर्षांचा असताना त्याचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेत जमीन विकली होती. त्यावेळी तीन वर्षांत मुलगा इतिहास निर्माण करेल, अशी अपेक्षा नव्हती.

टॉप पाच खेळाडू विकले गेले नाही

  1. आयपीएलमधील आश्चर्यकारक म्हणजे सहा चेंडूत सहा षटकार ठोकणारा प्रियांश का अगदी कमी किंमतीत विकला गेला आहे. त्याची किंमत ३० लाख होती. परंतु तो १३ पट कमी किंमतीत विकला गेला. त्याने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. तसेच डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ, नवीन उल हक, शार्दूल ठाकूर विकले गेले नाही.
  2. आयपीएलमध्ये ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला लखनऊ संघाने २७ कोटी रुपयांना विकत घेतले. सर्वात महाग परदेशी खेळाडू इंग्लंडचा जोस बटलर ठरला. त्याला गुजरात टायटन्सने १५.७५ कोटी रुपयांना विकत घेतले.
  3. अष्ट्रपैलू खेळाडूंचा विचार केल्यास व्यंकटेश अय्यर हा सर्वात महागडा अष्टपैलू खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्स या संघाने २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. अष्टपैलू परदेशी खेळाडू ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस ठरला. त्याला पंजाब किंग्ज या संघाने ११ कोटींमध्ये घेतले.
  4. गोलंदाजांचा विचार केल्यावर अर्शदीप सिंग हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्याला पंजाब किंग्सने १८ कोटी रुपयांना विकत घेतले. परदेशी महाग गोलंदाज म्हणून जोश हेझलवूड, जोफ्रा आर्चर आणि ट्रेंट बोल्ट यांची नावे आहेत. या तिघं खेळाडूंना वेगवेगळ्या संघांनी १२.५० कोटी रुपयांना घेतले आहे.
  5. स्पिनरमध्ये युझवेंद्र चहल हा सर्वात महागडा गोलंदाज आहे. त्याला पंजाब किंग्जने १८ कोटींत विकत घेतले. परदेशी स्पिनर खेळाडूत अफगाणिस्तानचा नूर अहमद हा सर्वात महागडा आहे. त्याला चेन्नईने 10 कोटी रुपयांना घेतले.

यंदाच्या आयपीएल लिलावात गुजरात आणि मुंबई दोन संघ मजबूत झालेले दिसत आहे. गुजरातने गोलंदाजी आक्रमक करण्यावर भर दिला. त्यासाठी त्यांनी कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, राशिद खान यांना घेतले. कर्णधार म्हणून शुभमन गिल आहे. सामना फिरवणारा राहुल तेवतिया आहे. तसेच जॉस बटलर, प्रसिद्ध क्रिष्णा, वॉशिंग्टन सुंदर यांच्यामुळे संघ समतोल झाला आहे. दुसरीकडे मुंबईने ट्रेंट बोल्टचा समावेश करुन गोलंदाजी अधिक भक्कम केली आहे. राजस्थान संघाला बटलरची कमकरता जाणवणार आहे. आयपीएलचा लिलाव पार पडला. आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष २०२५ मध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यांकडे लागले आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.