Vaibhav Suryavanshi : ‘अरे भाई, मी 5-6 षटकार हाणले’, गोलंदाज म्हणाला, मला तर नाही दिसले, वैभव सूर्यवंशीची लुटुपुटुची लढाई व्हायरल, Video

Vaibhav Suryavanshi-Fazalhaq Farooqi : पंजाब किंग्सविरोधातील सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशी आणि फजलहक फारुकीचा सरावाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यात दोघांचा षटकार वा चौकार हाणला यावरून लुटुपुटीची लढाई व्हायरल झाल आहे. तो Video पाहिला का?

Vaibhav Suryavanshi : अरे भाई, मी 5-6 षटकार हाणले, गोलंदाज म्हणाला, मला तर नाही दिसले, वैभव सूर्यवंशीची लुटुपुटुची लढाई व्हायरल, Video
वैभव सूर्यवंशी
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 18, 2025 | 5:20 PM

वैभव सूर्यवंशीने कमी वयात क्रिकेट जगतात कमाल करून दाखवली. सध्या प्रत्येकाची तोंडी त्याचे नाव आहे. अवघ्या 14 वर्षीच त्याने मोठा कारनामा करून दाखवला. त्याच्या उत्तुंग षटकारांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे पेडले. गोलंदाजांना न घाबरता तो त्याने भिडतो, ही त्याची हटके स्टाईल अनेकांना आवडली आहे. तो म्हणतो की मी गोलंदाज नाही त्याचा चेंडू पाहतो. त्याचा आत्मविश्वास एकदम पक्का आहे. त्यामुळेच नेट प्रॅक्टिस दरम्यान त्याने 5 ते 6 षटकार हाणल्याचा दावा केला. तर गोलदांज फजलहक फारुकीने तो दावा काही मान्य केला नाही. ही लुटुपुटुची लढाई तुम्हाला गल्ली क्रिकेटची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. तो Video तुम्ही पाहिला का?

वैभव आणि फारुकीची लुटुपुटुची लढाई

फजलहक फारूकी हा पण वैभव सूर्यवंशी प्रमाणेच IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचा घटक आहे. पंजाब किंग्सविरोधात त्यांचा सामना आहे. त्यापूर्वी दोघेही सराव करताना दिसले. नेट प्रॅक्टिस दरम्यान वैभव सूर्यवंशीने फजलहक फारुकीच्या भेदक गोलंदाजीचा सामना केला. त्याने त्याच्या चेंडूवर अनेकदा दमदार खेळी केली तर काही वेळा तो विचारपूर्वक खेळला. दोघांनी पण चांगलाच घाम गाळला.

वैभव सूर्यवंशीने फारुकीच्या गोलंदाजीचे जमके कौतुक केले. मग हळूच त्याने जास्त काही नाही, 5-6 षटकार ठोकता आले, असा चिमटा काढला. इतके ऐकताच फजलहक फारुकी म्हटला फार तर 1-2 षटकार लगावले असशील तू. त्यानंतर वैभव म्हणाला की 1-2 तर चौकार हाणले. अर्थात कोणाचा दावा खरा हे काही कळू शकले नाही. आज पंजाब किंग्सविरोधात हे दोन्ही खेळाडू काय कमाल करतात, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे. पण या लुटुपुटुच्या लढाईने अनेकांना त्यांचा गल्ली क्रिकेट आठवला. मित्रांसोबत छोट्या छोट्या गोष्टींसाठीची भांडणं, गंमती-जमती आठवल्या.

IPL 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीचे प्रदर्शन

वैभव सूर्यवंशीने IPL 2025 मध्ये 5 सामने खेळले. त्यात त्याने 155 धावा केल्या. त्यात त्याने एक शतक पण ठोकले. अवघ्या 35 चेंडूत त्याने वेगवान 100 धावा केल्या. त्याने नवीन विक्रम केला. इतक्या कमी वयात अशी कामगिरी करणाऱ्या या खेळाडूने जगाचे लक्ष्य त्याच्याकडे वेधून घेतले. या 5 सामन्यात वैभव सूर्यवंशीचा स्ट्राईक रेट 209.45 असा राहिला.