AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025, MI vs SRH : मुंबई-हैदराबाद मॅचमध्ये मोठ्ठं ब्लंडर… आऊट झालेला बॅट्समन परत का आला ?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज रायन रिकेलटनला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावण्यात आले आणि त्याने फ्री-हिट चेंडूचा सामना केला. ही घटना घडली तेव्हा रिकेलटन 21 धावांवर खेळत होता.

IPL 2025, MI vs SRH : मुंबई-हैदराबाद मॅचमध्ये मोठ्ठं ब्लंडर... आऊट झालेला बॅट्समन परत का आला ?
मुंबई-हैदराबाद मॅचमध्ये ब्लंडर... Image Credit source: social media
Updated on: Apr 18, 2025 | 10:52 AM
Share

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad : इंडियन प्रीमिअर लीग (IPL) 2025 च्या सीझनमध्ये काल अर्थात 17 एप्रिल (गुरूवार) मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना रंगला. वानखेडेमध्ये झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 4 विकेट्सनी विजय मिळवला. विजयासाठी असलेले 163 धावांचे आव्हान मुंबईने 11 चेंडू राखून सहज पूर्ण केलं.

पण याच मॅचमध्ये झालेल्या मोठ्या ब्लंडरची सगळीकडे चर्चा आहे. नेमकं काय झालं ?

आऊट झालेला फलंदाज परत मैदानावर आला आणि..

कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची बॅटिंग सुरू असताना 7 व्या ओव्हरमध्ये जबरदस्त बवाल झाला. ती ओव्हर सनरायजर्स हैदराबादचा स्पिनर झिशान अन्सारीने टाकली होती. त्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अन्सारीने मुंबईचा फलंदाज रयान रिकेल्टनला पॅट कमिन्सकडून बाद केलं. त्यानंतर रिकेल्टन हा बाऊंड्री लाईनपर्यंत पोहोचला होता. मात्र तेवढ्यात जे घडलं त्याने सगळेच हैराण झाले. फोर्थ अंपायरने रिकेल्टनला बाऊंड्रीपाशीच रोखलं.

रयानला रोखण्याचं कारण म्हणजे विकेटकीप हेनरिक क्लासेन याने केलेल घोडचूक.. जेव्हा चेंडू बॅटला लागला तेव्हा क्लासेनचे ग्लोव्हज स्टंपसमोर पोहोचले होते, असे रिप्लेमध्ये थर्ड अंपायरला आढळलं. नियम 27.3.1 अनुसार,जर विकेटकीपरने स्टंपसमोर किंवा स्टंपच्या रेषेत चेंडू घेतला तर पंच नो-बॉलचा संकेत देऊ शकतात.

जरी हेनरिक क्लासेनला बॉल उचलण्याची गरज नव्हती कारण बॉल त्याच्याकडे आला नाही, तरीही त्याचे ग्लोव्हज स्टंपसमोर होते. अशा परिस्थितीत, नियमांनुसार, हा बॉ नो-बॉल घोषित करण्यात आला. विकेटकीपरच्या निष्काळजीपणामुळे रायन रिकेलटनला जीवनदान मिळाले. त्यामुळे बाद झालेल्या रायन रिकेलटनला फलंदाजीसाठी पुन्हा बोलावण्यात आले आणि त्याने फ्री-हिट बॉलचा सामना केला. ही घटना घडली तेव्हा तो २१ धावांवर होता. नंतर रिकेल्टनने आणखी 10 धावा फटकावल्या. मात्र त्यानंतर हर्ष पटेलने रिकेल्टनचा बळी घेतला.

माजी अंपायर अनिल चौधरी काय म्हणाले?

कॉमेंट्री करणाऱ्या हरभजन सिंग आणि अंबाती रायुडू या दोघांनीही या विषयावर चर्चा केली. यादरम्यान, आधी अंपायर असलेले व नंतर कॉमेंट्रेटर बनलेले अनिल चौधरी यांच्याशीही ते दोघे बोलले. खेळादरम्यान क्लासेनचे ग्लोव्हज पुढे आले होते, म्हणूनच चेंडू नो बॉल घोषित करण्यात आला, असं त्यांनी सांगितलं.

19 जुलैला 'राज' उलगडणार? ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर पाहिलात?
19 जुलैला 'राज' उलगडणार? ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर पाहिलात?.
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर, चर्चांना उधाण
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर, चर्चांना उधाण.
पीएफच्या पैशांतून घर घेताय? EPFOच्या नव्या नियमामुळे नो टेन्शन, कारण..
पीएफच्या पैशांतून घर घेताय? EPFOच्या नव्या नियमामुळे नो टेन्शन, कारण...
पक्षातच इज्जत नसेल तर... महाजनांकडून खदखद व्यक्त, डोळ्यात पाणी अन्...
पक्षातच इज्जत नसेल तर... महाजनांकडून खदखद व्यक्त, डोळ्यात पाणी अन्....
काहींना घरी जावं लागलंय... शिंदेंकडून आमदार अन् मंत्र्यांना वॉर्निंग
काहींना घरी जावं लागलंय... शिंदेंकडून आमदार अन् मंत्र्यांना वॉर्निंग.
22 तारखेला काय होणार निर्णय? निलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर सुनावणी
22 तारखेला काय होणार निर्णय? निलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर सुनावणी.
शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!
शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!.
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी.
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत.
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत.