AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीची इनिंग पाहून क्रिकेटचा देवही स्वत:ला रोखून शकला नाही, म्हणाला…

राजस्थान रॉयल्सने जेव्हा Vaibhav Sooryavanshi ला IPL ऑक्शनमध्ये विकत घेतलं, तेव्हा तो फक्त 13 वर्षांचा होता. आपल्या डेब्यू सीजनच्या तिसऱ्याच सामन्यात तो शतकी इनिंग खेळला. अनेक दिग्गजांचे रेकॉर्ड त्याने तोडले.

Vaibhav Sooryavanshi : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीची इनिंग पाहून क्रिकेटचा देवही स्वत:ला रोखून शकला नाही, म्हणाला...
sachin tendulkar-vaibhav sooryavanshiImage Credit source: PTI
| Updated on: Apr 29, 2025 | 9:31 AM
Share

IPL च्या इतिहासात 28 एप्रिल 2025 ची संध्याकाळ नेहमी लक्षात ठेवली जाईल. कारण अवघ्या 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्स विरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकलं. T20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा तो सर्वात युवा खेळाडू बनला आहे. सोबतच T20 मध्ये वेगवान शतक झळकवणारा तो पहिला भारतीय बनला आहे. वैभव सूर्यवंशीच्या या शतकानंतर सोशल मीडियावर फक्त त्याच्या नावाची चर्चा आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशिवाय जगातील अनेक दिग्गज क्रिकेटपटुंनी या युवा क्रिकेटरच कौतुक केलय. सोशल मीडियावर त्याच्यासाठी पोस्ट केली आहे. सचिनने वैभवच्या शतकाचा व्हिडिओ शेअर केलाय. त्याच्या इनिंगबद्दल विस्ताराने लिहिलय.

“वैभवचा बिनधास्त अप्रोच, बॅटचा स्पीड, लेंथ लवकर समजून घेणं आणि चेंडूची एनर्जी ट्रान्सफर करण्याची क्षमता हीच त्याच्या शानदार इनिंगची रेसिपी आहे” अशा शब्दात सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीच कौतुक केलय.

“तुम्ही 14 वर्षाचे होता, तेव्हा काय करत होता?. हा मुलगा जगातल्या बेस्ट गोलंदाजांचा सामना करत आहे. वैभव सूर्यवंशी हे नाव लक्षात ठेवा! निडर होऊन खेळतोय. पुढच्या पिढीचा असा खेळ पाहून अभिमान वाटतो” अशा शब्दात युवराज सिंगने वैभव सूर्यवंशीच कौतुक केलं.

“वैभव सूर्यवंशी उत्तम टॅलेंट. फक्त वयाच्या 14 व्या वर्षी शतक झळकवण विश्वास बसत नाही. नेहमी चमकत रहा भावा” अशा शब्दात मोहम्मद शमीने वैभवच कौतुक केलं.

वैभव सूर्यवंशीच्या आधी IPL मध्ये भारताकडून सर्वात वेगवान शतक यूसुफ पठानने झळकवलं होतं. यूसुफ पठानने 13 मार्च 2010 साली राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध 37 चेंडूत शतक झळकावलं होतं. “आयपीएलमध्ये भारतीय म्हणून सर्वाधिक वेगवान शतक झळकवण्याचा माझा रेकॉर्ड मोडल्याबद्दल वैभव सूर्यवंशीच अभिनंदन. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने हा रेकॉर्ड तोडला. ही गोष्ट मला खास वाटली. या फ्रेंचायजीमध्ये युवकांसाठी काहीतरी जादू आहे” अशी यूसुफ पठानने X वर पोस्ट केली आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.