IPL 2025 : मोठी बातमी! प्लेऑफदरम्यान प्रिती झिंटा कोर्टात, पंजाब किंग्सशी काय कनेक्शन, अपडेट जाणून घ्या
Preity Zinta Legal Case : बॉलिवूड अभिनेत्री आणि आयपीएल पंजाब किंग्स संघाची सह मालक प्रिती झिंटा न्यायालयात पोहचली आहे. प्लेऑफदरम्यान प्रितीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय आहे हे प्रकरण?

Punjab Kings Controversy : बॉलिवूड अभिनेत्री आणि आयपीएल पंजाब किंग्स संघाची सह मालक प्रिती झिंटा हिने चंदीगड येथील एका न्यायालयात धाव घेतली आहे. तिने तिचे व्यावसायिक भागीदार मोहित बर्मन आणि नेस वाडिया यांच्याविरोधात केस दाखल केली आहे. केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या एका बैठकीविषयीचा हा वाद असल्याचे समोर येत आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.
काय आहे हे प्रकरण?
प्रिती झिंटा, मोहित बर्मन आणि नेस वाडिया हे तिघे पंजाब किंग्सची मालकी असलेली कंपनी केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. ही कंपनी वर्ष 2008 मध्ये तयार करण्यात आली होती. या तिघांशिवाय करण पॉल हे पण एक संचालक आहेत. प्रिती झिंटाने न्यायालयात म्हणणे मांडले आहे की, नियमांना डावलून २१ एप्रिल रोजी एक एक्स्ट्रा-ऑर्डिनरी जनरल मीटिंग (EGM) बोलावण्यात आली. कंपनी कायदा, २०१३ आणि सचिवीय नियमांन्वये योग्य प्रक्रियेचे पालन न करता बैठक बोलावण्यात आली. 10 एप्रिल रोजी तिने एका ईमेलद्वारे तिने या बैठकीवर तिचा आक्षेप नोंदवला होता. पण तरीही ही बैठक झाली आणि तिच्या हरकतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजतकने याविषयीचे वृत्त दिले आहे.
The one where our Chairman, Dr. Sanjiv Goenka, met Preity Zinta and Ness Wadia 🤝💙 pic.twitter.com/owxG8CghPY
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 5, 2025
कोर्टातील अपिलात काय म्हणणे?
ही बैठक अवैध जाहीर करावी
या बैठकीत नियुक्त करण्यात आलेले मुनीश खन्ना यांना संचालक म्हणून काम करण्यास रोखावे
या बैठकीला प्रिती झिंटा आणि करण पॉल हे दोघे हजर होते. त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या निर्णयाला विरोध केला होता. मुख्य आक्षेप मुनीश खन्ना यांच्याविषयीचा आहे.
Ness Wadia, co-owner of Punjab Kings, is the silent force behind our loud roars! 🦁💪🏻
Always there. Always steady. 🙌🏻#PunjabKings pic.twitter.com/iH7jShu2k7
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 5, 2025
पंजाब किंग्सची कथा
पूर्वी या संघाचे नाव किंग्स इलेव्हन पंजाब असे होते. 2008 मध्ये प्रिती झिंटा, मोहित बर्मन, नेस वाडिया आणि करण पॉलने जवळपास 304 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्यावेळी राजस्थान रॉयल्स (268 करोड़) आणि कोलकाता नाईट रायडर्स (300 करोड़) ची किंमत यापेक्षा कमी होती. वर्ष 2021 मध्ये या टीमचे नाव पंजाब किंग्स असे करण्यात आले. ही टीम आतापर्यंत एकदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडकली आहे.
Post game Selfie 💕👊💃 All smiles after PBKS qualified for the playoffs 🤩 Ting !
Bas Jeetna Hai ! Sadda Punjab! pic.twitter.com/sAOD671T9u
— Preity G Zinta (@realpreityzinta) May 21, 2025
IPL 2025 मध्ये पंजाब किंग्सची कामगिरी
आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सने जोरदार कामगिरी बजावली आहे. संघाने 12 मधील 8 सामने खिशात घालत आणि 17 अंकासह तिसरे स्थान पटकावले आहे.
