IPL 2025 : आयपीएल विजेत्या संघावर पैशांचा पाऊस; उपविजेत्याच्या झोळीत ही पडणार खजिना, रक्कम माहिती आहे का?
IPL 2025 Winner prize money : प्लेऑफ मध्ये गुजरात, बेंगळुरु, पंजाब आणि मुंबई संघाने त्यांचे स्थान पक्के केले आहे. आता आयपीएल विजेत्या संघाला, उपविजेत्या संघाला किती कोटींचे बक्षिस मिळेल तुम्हाला माहिती आहे का?

Indian Premium League च्या 18 वा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. त्यातील चार संघ नक्की झाले आहेत. या संघात आता अंतिम लढत होईल. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान तयार करणारी चौथी टीम झाली आहे. यापूर्वी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्सने त्यांची जागा पक्की केली. या चारमधील दोन संघ, RCB आणि PBKS या ट्रॉफीवर नाव करण्याच्या तयारीत आहे. या ट्रॉफीमध्ये विजेत्या संघाला किती रक्कम मिळेल हे तुम्हाला माहिती आहे का?
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल किताब पटकवला आहे. तर गुजरात टायटन्सने एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर आरसीबी आणि पंजाब किंग्स या हंगामात कर्तबगारी दाखवण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही संघ मजबूत स्थितीत आहेत. आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांची सुरुवात 29 मेपासून होत आहे. तर अंतिम सामना हा 3 जून रोजी खेळण्यात येणार आहे.
आयपीएल 2025 चे अंतिम वेळापत्रक
यापूर्वी उपांत्य आणि अंतिम सामने हे कोलकता आणि हैदराबाद येथे होणार होते. पण आयपीएल सामने स्थगित झाले होते. 25 मे रोजी होणारा अंतिम सामना आता 3 जून रोजी होणार आहे. भारत पाक संघर्षानंतर त्यात बदल करण्यात आला. आता अंतिम सामना आणि उपांत्य सामना कोलकताऐवजी अहमदाबाद येथे होईल. तर इतर दोन सामने मोहाली येथे खेळले जातील.
IPL 2025 प्लेऑफ वेळापत्रक
पात्र संघ 1 – 29 मे 2025 सामना: गुणतालिकेत उत्कृष्ट 2 क्रमांकाच्या संघांमध्ये ठिकाण: न्यू PCA स्टेडियम, मोहाली
एलिमिनेटर – 30 मे 2025 सामना: गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये ठिकाण: न्यू PCA स्टेडियम, मोहाली
क्वालिफायर 2 – 1 जून 2025 सामना: क्वालिफायर 1 हरलेला संघ vs एलिमिनेटर जिंकलेला संघ ठिकाण: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
फायनल – 3 जून 2025 सामना: क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 जिंकलेले संघ ठिकाण: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
विजेत्या संघाला किती बक्षीस?
आयपीएल 2025 जिंकणाऱ्या संघ- 20 कोटी
तर उप-विजेता संघ – 12.5 कोटी
तिसरा क्रमांकाचा संघ – 7 कोटी
तर चौथ्या क्रमांकावरील संघ – 6.5 कोटी
