IPL 2025 : विराट कोहलीच्या सुरक्षेत मोठी चूक, मैदानात घडली अशी घटना… घाबरला क्रिकेटर
Virat Kohli: 'त्याच्यासाठी वाईट वाटतं...', क्रिकेटच्या मैदानात विराट कोहलीच्या सुरक्षेत इतकी मोठी चूक, मैदानात घडली धक्कादायक घटना... क्रिकेटर घाबरला आणि..., सध्या विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

IPL 2025 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयपीएल 2025 ची चर्चा सुरु आहे. आयपीएल 2025 चा 28 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने एकतर्फी विजय मिळवला. सध्या सर्वत्र संघाचा कौतुक होत आहे. सर्वप्रथम गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली आणि नंतर विराट कोहलीच्या खेळीमुळे सामना एकतर्फी झाला. पण सामन्यानंतर एक अशी घटना घडली ज्यामुळे विराट कोहली देखील घाबरला. दरम्यान, जयपूरमधील सामन्यानंतर विराटच्या सुरक्षेत मोठी चूक दिसून आली.
विराट कोहलीच्या सुरक्षेत मोठी चूक
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगलेला सामना संपल्यानंतर घडलेल्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विराट राजस्थान रॉयलचा कोच राहुल द्रविड आणि विक्रम राठोड यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. तेव्हाच एका चाहते मैदानात विराट कोहली जवळ पोहोचला.
चाहत्याला असं पाहिल्यानंतर विराट प्रचंड घाबरला आणि स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागला. पण विराटपर्यंत पोहोचण्यापूर्वीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चाहत्याला पकडले. सांगायचं झालं तर ही घटना विराट कोहली याच्यासोबत पहिल्यांदा घडलेली नाही. व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘त्याच्यासाठी वाईट वाटतं…’
A fan entered the ground to meet Virat but….!!! this happens 😅 pic.twitter.com/0dzPciBO2l
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) April 13, 2025
विराट कोहली याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी विराट कोहलीचे चाहते उत्सुक असतात. यापूर्वी, आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यादरम्यान, एक चाहता विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात आला होता. त्याने विराट कोहलीला मिठी मारली आणि त्याच्या पायांना स्पर्शही केला. गेल्या सीझनमध्ये चाहत्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर चुकवून अनेकांना विराट कोहलीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं होतं.
रविवारी रंगलेल्या सामन्याबद्दल सांगायचं झालं तर, RCB चा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो योग्य ठरला. आरसीबीच्या गोलंदाजांसमोर राजस्थान संघ 20 षटकांत चार गडी गमावून केवळ 173 धावाच करू शकला. आरसीबीच्या विराटने हे लक्ष्य फक्त 1 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आरसीबीकडून फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने दमदार खेळी केली. सॉल्टने 65 धावा केल्या. त्याच वेळी, विराट 62 धावा करून नाबाद राहिला.
