AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! IPL 2025 स्थगित, भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय

भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2025 ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. बुधवारी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने हाणून पाडला. पण या हल्ल्याचा परिणाम आयपीएलवर दिसून आला.

मोठी बातमी ! IPL 2025 स्थगित, भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय
IPL 2025 स्थगितImage Credit source: PTI
| Updated on: May 09, 2025 | 12:53 PM
Share

भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2025 ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलीआहे. बीसीसीआय लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे.  बुधवारी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्यांची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले. पण या हल्ल्याचा परिणाम आयपीएलवर दिसून आला. धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सीझनमधील 58 वी मॅच सुरू होती, ती मध्यातच थांबवण्यात आली.

IPL 2025 स्थगित

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यात 100 दहशतवादी मारले गेले. मात्र भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान चवताळला. त्यांनी एकामागोमाग एक असे हल्ले चढवत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत, केंद्र आणि सर्व फ्रँचायझी आणि भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर, आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच उर्वरित सामने नंतर होतील. मात्र या मॅच कधी आणि केव्हा खेळवल्या जातील याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही.

अलीकडेच अशा बातम्या समोर आल्या होत्या की, आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या अनेक परदेशी खेळाडूंनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआय या परदेशी खेळाडूंना शक्य तितक्या लवकर त्यांच्या देशात पाठवेल. या परदेशी खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंब देखील सध्या भारतात आहे.  भारत-पाक मधील तणावाच्या परिस्थितीत बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयपीएल स्थगित झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली. “देश युद्धात असताना क्रिकेट सुरू असेल तर ते योग्य दिसत नाही” असं त्यांनी  पीटीआयशी बोलताना सांगितलं.

सीझनमध्ये 16 मॅचेस बाकी 

आयपीएल 2025 च्या या सीझनमध्ये एकूण 57 सामने खेळवण्यात आले आहे. काल 58 वा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. या सीझनमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार होते, 25 मे रोजी कोलकाता येथे ही स्पर्धा संपणार होती. मात्र आता ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक तयार केले जाईल. 2021 च्या सुरुवातीलाही असंच काहीस घडलं होतं. तेव्हा आयपीएल ही सीझनच्या मध्यातच स्थगित करण्यात आली होती. कोरोनामुळे आयपीएल 2021 स्थगित करण्यात आली. त्यानंतर उर्वरित सामने यूएईमध्ये झाले.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.