IPL : जोसेफची पदार्पणात भेदक गोलंदाजी, 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला!

हैदराबाद : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने आपल्या पहिल्याच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली. यामध्ये जोसेफने आयपीएलच्या पदार्पणातचं 12 वर्षापूर्वीचा (2008) विक्रम मोडीत काढला आहे. जोसेफने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात 12 धावांत 6 बळी घेतले. गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर 40 धावांनी मात केली. यापूर्वी हा विक्रम राजस्थान रॉयल्सचा पाकिस्तासंघाचा …

IPL : जोसेफची पदार्पणात भेदक गोलंदाजी, 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला!

हैदराबाद : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने आपल्या पहिल्याच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली. यामध्ये जोसेफने आयपीएलच्या पदार्पणातचं 12 वर्षापूर्वीचा (2008) विक्रम मोडीत काढला आहे. जोसेफने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात 12 धावांत 6 बळी घेतले. गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर 40 धावांनी मात केली. यापूर्वी हा विक्रम राजस्थान रॉयल्सचा पाकिस्तासंघाचा वेगवान गोलंदाज सोहेल तनवीरने केला होता. सोहेलने चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धच्या सामन्यात (CSK)  4 षटकात 14 धावांत 6 बळी घेतल्या होत्या.

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात अल्झारी जोसेफने आपल्या चमकदार कामिगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. जोसेफने आपल्या पहिल्या चेंडूत वॉर्नरला बाद केले. मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद समोर विजयासाठी 137 धावांचे आव्हान ठेवलं. सनरायझर्स हैदराबादकडून सलामीला वॉर्नर आणि बेअरस्टॉ मैदानात उतरले. मात्र त्यांना चांगली सलामी देता आली नाही. वॉर्नर 15 तर बेअरस्टॉ 16 धावांवर बाद झाले.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजी केली. मुंबईने कायरन पोलार्डच्या 46 धावांच्या जोरावर, निर्धारीत 20 षटकात 7 बाद 136 धावा केल्या. सनरायझर्सच्या मजबूत फलंदाजीसमोर मुंबई इंडियन्सचा पराभव होईल अशी शक्यता वाटत होती. मात्र अल्झारी जोसेफ आणि राहुल चाहरच्या दमदार गोलंदाजीच्या मदतीने सनरायझर्सचा डाव 96 धावांत आटोपला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हैदराबादला पराभव करणे शक्य झाले.

मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात मलिंगाच्या जागेवर वेस्ट इंडीजच्या अल्झारी जोसेफला संधी दिली. 22 वर्षाच्या या गोलंदाजाने आयपीएलमधील पहिल्या सामन्यातील उत्कृष्ट अशा गोलंदाजीने मुंबई संघाला विजय मिळवून दिला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *