AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : लग्नानंतर बुमराहचं क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन, घातक यॉर्करने दांडी गुल, मुंबईकडून व्हिडीओ शेअर!

लग्नानंतर बुमराहचा पहिलाच आयपीएल (IPL 2021) हंगाम आहे. बुमराहच्या यॉर्करचा व्हिडीओ ट्विट करत समोरील संघांची दांडी गुल करण्यास बुमराह सज्ज असल्याचं मुंबई इंडियन्सने  (Mumbai Indians) सांगितलं आहे. Jasprit Bumrah Fantastic yorker Mumbai Indians Video

IPL 2021 : लग्नानंतर बुमराहचं क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन, घातक यॉर्करने दांडी गुल, मुंबईकडून व्हिडीओ शेअर!
Jasprit Bumrah
| Updated on: Apr 05, 2021 | 10:28 AM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्सचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) लग्नानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं आहे. लग्नानंतर त्याचा हा पहिलाच आयपीएल (IPL 2021) हंगाम आहे. बुमराहच्या यॉर्करचा व्हिडीओ ट्विट करत समोरील संघांची दांडी गुल करण्यास बुमराह सज्ज असल्याचं मुंबई इंडियन्सने  (Mumbai Indians) सांगितलं आहे. सरावादरम्यानचा हा व्हिडीओ दिसून येत आहे. या व्हिडीओत त्याने अप्रतिम यॉर्कर टाकून स्टम्पचा अचूक वेध घेतला आहे. (Jasprit Bumrah Fantastic yorker Mumbai Indians Video)

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झालाय. बुमराह प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत (sanjana ganesan) लग्नबेडीत अडकला आहे. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. या विवाह सोहळ्यानंतर बुमराहने मुंबईच्या इंडियन्सच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये भाग घेतला आहे. या सराव शिबिरात तो प्रचंड घाम गाळताना दिसून येत आहे.

पाहा व्हिडीओ :

बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात

जसप्रीत बुमराह प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत (sanjana ganesan) काहीच दिवसांपूर्वी लग्नबेडीत अडकला आहे. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. लग्नासाठी संजना गणेशन आणि आणि (Anupama Parameswaran) दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांच नाव चर्चेत होतं. पण बुमराहने संजनासोबत लगीनगाठ बांधली. आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे.

पाठीमागच्या मोसमात बुमराहच्या नावावर मुंबईकडून सर्वाधिक विकेट्स

नुकताच लग्नबंधनात अडकलेला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आयपीएलच्या रणसंग्रामासाठी सज्ज झाला आहे. 2013 पासून तो मुंबईकडून खेळतो आहे. पाठीमागच्या मोसमात त्याने मुंबईकडून 27 विकेट्स घेऊन मुंबईला चॅम्पियन बनविण्यात सिंहाचा वाटा उचलला.

आयपीएलचं रण सज्ज, पहिला सामना 9 तारखेला

इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल (IPL 2021) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(Jasprit Bumrah Fantastic yorker Mumbai Indians Video)

हे ही वाचा :

IPL 2021 : ‘भल्या भल्यांच्या केल्या बत्त्या गुल…’ मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजांना रोखायचं कसं?, प्रतिस्पर्धी संघांना टेन्शन!

Video : क्विंटन डिकॉकची चतुर खेळी, ‘त्या’ एका इशाऱ्याने फकरची झुंजार इनिंग संपवली, द्विशतक 7 धावांनी हुकलं!

49 रन्सवर आऊट केलं म्हणून बॅट्समनने फिल्डरला बॅटने बडवलं, पोलीस ठाण्यात तक्रार, फिल्डर बेशुद्ध!

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.