जोफ्रा आर्चर टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार? समोर आली मोठी बातमी

ईसीबीने दिलेल्या माहितीनुसार, "इंग्लंड आणि ससेक्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या कोपऱ्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. (Jofra Archer Fitness Update India vs England test Series)

जोफ्रा आर्चर टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार? समोर आली मोठी बातमी
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर...
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 7:57 AM

मुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांचा कर्दनकाळ मानल्या जाणारा जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे मागील काही दिवसांपासून त्रस्त आहे. कोपराच्या दुखापतीमुळे त्याने दोन स्पर्धांमधून माघार घेतली. त्याच्या कोपरावर शस्त्रक्रिया पार पडलीय. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला इथून पुढचे 28 दिवस गोलंदाजी करता येणार नाही किंबहुना हाताचीही जास्त हालचाल करता येणार नाही. 28 दिवसांनंतर म्हणजेच एक महिन्यानंतर पुढील टेस्ट घेऊन तो गोलंदाजी करु शकेल काय? हे पाहावं लागेल, अशी माहिती डॉक्टरांच्या सांगण्यानुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) दिली आहे. त्यामुळे आर्चर भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार की नाही हे समजण्यासाठी, भारताला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. (Jofra Archer Fitness Update India vs England test Series)

आर्चर भारताविरुद्ध टेस्ट सिरीज खेळणार?

ईसीबीने दिलेल्या माहितीनुसार, “इंग्लंड आणि ससेक्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या कोपऱ्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. इथून पुढचे काही दिवस ईसीबी आणि ससेक्सच्या मेडिकल टीमच्या मार्गदर्शनाखाली आर्चर ‘रिहॅब्लिटेशन वेळ’ सुरु करणार आहे.” शस्त्रक्रियेनंतरच्या पुढच्या 28 दिवसांमध्ये त्याच्यात काय बदल होतोय, याचं निरीक्षण दोन्ही मेडिकल टीम करणार आहेत. यानंतर आर्चर भारताविरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठी तयार आहे का, हे पाहिलं जाणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची आशा

यावर्षीच्या शेवटी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या अॅशेस मालिकेपर्यंत जोफ्रा आर्चरने ठीक व्हावं आणि या मालिकेत खेळावं, अशी आशा इंग्लंड संघाला असणार आहे. आर्चर पाठीमागच्या एका वर्षांहून अधिक काळ कोपराच्या समस्येपासून दूर आहे. या कारणामुळे आर्चर दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धच्या काही सामन्यांत बाहेर बसला होता.

आयपीएलमध्येही खेळला नाही

आर्चरच्या हाताला दुखापत झाल्याने तो यंदाच्या आयपीएल मोसमाला मुकला. स्पर्धा सुरु होण्याअगोदर त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती. भारताविरुद्ध 5 व्या टी ट्वेन्टी सामन्यानंतर त्याला दुखापतीमुळे क्रिकेटपासून काही दिवस लांब राहावं लागलं.

काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये पुनरागमन

हातावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने पुन्हा मैदानात पुनरागमन केलं होतं. काऊंटी चॅम्पियनशीपदरम्यान ससेक्स संघातून तो खेळला. दुखापतीतून सावरल्यानंतर तो पुन्हा जुन्या लयीत दिसला.

दुखापतीनंतर आर्चरने शानदार पुनरागमन केलं आहे. ससेक्सकडून केंटविरुद्ध खेळताना त्याने 13 ओव्हर्समध्ये 2 रन्स देऊन 2 विकेट्स मिळवल्या. आर्चरने जॉक क्राऊली आणि केंटचा कर्णधार बेल डूमंड या दोन फलंदाजांना बाद करुन केंटच्या टीमला 145 रन्सवर ऑलआऊट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पण त्याच सामन्यात पुन्हा आर्चरचा कोपरा दुखायला लागला आणि त्याने उर्वरित सामन्यांत माघार घेतली.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

(Jofra Archer Fitness Update India vs England test Series)

हे ही वाचा :

Video : WTC फायनलअगोदर जीममध्ये घाम, रिषभ पंतचा हा स्टंट पाहिला का?

धोनी लवकरच चेन्नईला गुड बाय करणार, चोप्रांची आकाशवाणी!

लेकाची आईला मिठी, बाप हार्दिकची खास कमेंट

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.