AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खान अन् प्रीती झिंटानंतर आता ‘या’ अभिनेत्याची पण क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोणत्या संघाचा मालक बनला?

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने युरोपियन टी20 प्रीमियर लीगमध्ये फ्रँचायझी रॉटरडॅम डॉकर्समध्ये सह-मालक म्हणून गुंतवणूक केली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या लीगमध्ये सहा शहरांतील संघ सहभागी होतील.

शाहरुख खान अन् प्रीती झिंटानंतर आता 'या' अभिनेत्याची पण क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोणत्या संघाचा मालक बनला?
john abraham
| Updated on: Jun 26, 2026 | 3:59 PM
Share

बॉलिवूड आणि क्रिकेट हे काही वेगळे नाही. शाहरुख खान आणि प्रीती झिंटा तर आयपीएलमधील संघाचे मालक आहे. अभिनेता जॉन अब्राहमने क्रिकेटच्या जगात एक मोठी एन्ट्री केली आहे. तो आता युरोपियन टी20 प्रीमियर लीग फ्रँचायझी, रॉटरडॅम डॉकर्सचा सह-मालक बनला आहे. त्याच्या प्रवेशामुळे संघाच्या मालकी गटात आता क्रिकेटमधील दिग्गज जॉन्टी ऱ्होड्स, फॅफ डु प्लेसिस, हेनरिक क्लासेन आणि व्यवस्थापकीय भागीदार मधुकर श्री यांचा समावेश झाला आहे. युरोपियन टी20 प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 26 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल. या स्पर्धेत सहा शहरांमधील फ्रँचायझी सहभागी होतील, ज्यात ग्लासगो, ॲमस्टरडॅम, एडिनबर्ग, डब्लिन, बेलफास्ट आणि रॉटरडॅम येथील संघांचा समावेश आहे. संपूर्ण स्पर्धेत एकूण 32 सामने खेळले जातील.

या लीगचा उद्देश आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्ये क्रिकेटला नव्या उंचीवर नेणे आणि खेळाच्या विकासाला गती देणे हा आहे. आयोजकांचा विश्वास आहे की युरोपमध्ये क्रिकेटच्या विस्तारात ही लीग महत्त्वाची भूमिका बजावेल. सह-मालक बनल्यानंतर जॉन अब्राहम म्हणाला की, “क्रिकेटमध्ये लोकांना जोडण्याची, प्रेरणा देण्याची आणि नवीन संधी निर्माण करण्याची शक्ती आहे. त्यांच्या मते, युरोप सध्या क्रिकेटसाठी सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि रॉटरडॅम डॉकर्सकडे प्रबळ दूरदृष्टी, नेतृत्व आणि मोठी महत्त्वाकांक्षा आहे, ज्यामुळे फ्रँचायझीला एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत होऊ शकते.”

ईटीपीएलचे सह-संस्थापक अभिषेक बच्चन यांनी जॉन अब्राहमचे स्वागत करताना सांगितले की, खेळाबद्दलची त्याची आवड आणि क्रीडा व्यवसायातील अनुभव रॉटरडॅम डॉकर्ससाठी एक मोठी संपत्ती ठरेल. त्यांनी विश्वास व्यक्त केला की जॉनच्या उपस्थितीमुळे संघ आणि लीग या दोघांनाही एक नवीन ओळख निर्माण करण्यास मदत होईल.

युरोपियन टी20 प्रीमियर लीगच्या विविध फ्रँचायझी गटांमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू सहभागी आहेत. यामध्ये स्टीव्ह वॉ, राहुल द्रविड, जॉन्टी ऱ्होड्स, मॅथ्यू हेडन, फॅफ डु प्लेसिस आणि हेनरिक क्लासेन यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. परिणामी, लीगचा पहिला हंगाम सुरू होण्यापूर्वीच प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...