AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi Video: नाद करतो काय! वैभव बॅटिंगसह बॉलिंगमध्येही सरस, अभिषेक शर्माला असा चेंडू टाकला की त्याची बोलती बंद झाली

वैभव सूर्यवंशी हा फलंदाजीत तर कमाल करतोच हे सगळ्यांना माहित आहे पण तो गोलंदाजीतही तो अव्वल आहे हे खूप कमी लोकांना माहित आहे. आता सराव क्षेत्रात वैभवने अभिषेक शर्माला एक चेंडू असा फेकला जो पाहून अभिषेकलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Vaibhav Sooryavanshi Video: नाद करतो काय! वैभव बॅटिंगसह बॉलिंगमध्येही सरस, अभिषेक शर्माला असा चेंडू टाकला की त्याची बोलती बंद झाली
vaibhav sooryavanshi bowling to abhishek sharma
| Updated on: Jun 26, 2026 | 10:24 AM
Share

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वैभव सूर्यवंशी पदार्पण करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैभवने पदार्पण करताच तो सचिन तेंडुलकरांचा विक्रम मोडेल. वैभवने सामन्यापूर्वी खूप मेहनत घेतली आहे. बेलफास्टमधील सराव सत्रादरम्यान सूर्यवंशीने फिटनेस ड्रिल्स आणि जोरदार फलंदाजी करत खूप घाम गाळला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सूर्यवंशीने नेट्समध्ये बराच वेळ घालवून गोलंदाजीचाही सराव केला. त्याने नेट्समध्ये अभिषेक शर्मालाही गोलंदाजी केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याने जगातील नंबर 1 टी-20 फलंदाजाला चकवले. बेलफास्टमधील सरावादरम्यान, अभिषेक शर्मा वैभव सूर्यवंशीसोबत त्याच नेट्समध्ये फलंदाजी करत होता. अभिषेकने सूर्यवंशीच्या एका चेंडूवर मोठा फटका मारला, पण या 15 वर्षीय खेळाडूने पुढच्याच चेंडूवर त्याला चकवले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

फार कमी लोकांना हे माहीत आहे की सूर्यवंशी डावखुरी फिरकी गोलंदाजीही करतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने दोन बळी घेतले आहेत. अभिषेकने सुरुवातीला त्याला मोठा फटका मारला पण नंतर त्याने ज्या पद्धतीने चेंडू टाकला हे पाहून अभिषेकला पण आश्चर्याचा धक्का बसला. तर वैभव खळखळून हसला आणि त्याने आपला चेहरा लपवला. अभिषेकला चकवले यावर वैभवचा विश्वासच बसत नव्हता. टीम इंडियाने हे कौशल्य विकसित करण्याचा विचार केला असण्याची शक्यता आहे. जर सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीसोबतच गोलंदाजीनेही योगदान दिले, तर ते त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. भारताकडे गोलंदाजीही करू शकणाऱ्या फलंदाजांची कमतरता आहे. अभिषेक शर्माकडे हे कौशल्य आहे आणि आता सूर्यवंशीदेखील याच कौशल्यासह संघात सामील झाला आहे.

आता मोठा प्रश्न हा आहे की वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळेल का. हा प्रश्न विचारल्यावर, फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी स्पष्टपणे सांगितले की “वैभवला संधी मिळेल, पण प्रश्न हा आहे की ते कोणत्या फलंदाजाला वगळतील, कारण इतरही धावा करत आहे. वैभव सूर्यवंशीला संधी मिळेल, पण मला वाटते की केवळ धावा करणाऱ्यांना संधी देण्यासाठी आम्ही त्याला संघातून वगळणार नाही. हे त्याच्यासाठी अन्यायकारक ठरेल.” आता, कोटक यांच्या वक्तव्यावरून असे सूचित होते की सूर्यवंशीला किमान पहिल्या सामन्यासाठी तरी बेंचवर बसवले जाईल.

जर वैभव सूर्यवंशीला आयर्लंडमध्ये संधी मिळाली नाही, तर त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळू शकते. आयर्लंडनंतर, भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे सूर्यवंशीला संधी नक्कीच मिळेल. जर सूर्यवंशीने पदार्पण केले, तर तो भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल.

Follow Us
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....