IPL 2021 : ‘बापसे बेटी सवाई!’, बटलरच्या लेकीचा हृदयस्पर्शी Video

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) खेळाडू जॉस बटलर (Jos buttler) आणि त्याच्या लेकीचा एक सुंदरसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

IPL 2021 : 'बापसे बेटी सवाई!', बटलरच्या लेकीचा हृदयस्पर्शी Video
Jos Buttler

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) खेळाडू जॉस बटलर (Jos buttler) आणि त्याच्या लेकीचा एक सुंदरसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये जॉस आणि त्याची मुलगी जॉर्जिया (Georgia) व्यायाम करताना दिसून येत आहे. जॉसची मुलगी त्याला वर्कआऊटमध्ये मदत करताना व्हिडीओमध्ये दिसून येतंय. त्यामुळे ‘बापसे बेटी सवाई’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांमध्ये उमटत आहेत. (Jos buttler With Daughter Georgia Video Rajasthan Royals Share IPL 2021)

बापाला लेकीची खंबीर साथ

राजस्थान रॉयल्सने जॉस बटलर आणि त्याच्या लेकीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये बटलरची लेक त्याला वर्कआऊटमध्ये मदत करताना दिसून येत आहेत. बटलरच्या लेकींचं नाव जॉर्जिया आहे. दोघेही या व्हिडीओमध्ये पुश अप्स मारताना दिसून येत आहेत. जॉस जसं वर्क आऊट करतोय अगदी त्याच पद्धतीने जॉर्जिया देखील त्याची नक्कल करत आहे. बापाची हुबेहुब नक्कल करणारी जॉर्जिया नेटकऱ्यांना भावली आहे. त्यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

राजस्थान रॉयल्ससाठी बटलरची बॅट नेहमी तळपलीय…

इंग्लंडचा विकेट कीपर फलंदाज जॉस बटलरची बॅट राजस्थानकडून खेळताना नेहमी तळपलीय. 2018 मध्ये त्याने राजस्थाकडून खेळायला सुरु केलं. आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात त्याने 54 च्या सरासरीने 548 धावा ठोकल्या.

त्यानंतर 2019 च्या आयपीएल हंगामात त्याने 9 मॅचमध्ये 311 धावा केल्या. ज्यानंतर वर्ल्डकपच्या तयारीसाठी तो इंग्लंडला गेला. पाठीमागचा मोसमही त्याच्यासाठी चांगला गेला. त्याने 13 मॅचमध्ये 328 धावा काढल्या.

आयपीएलचं रण सज्ज, पहिला सामना 9 तारखेला

इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल (IPL 2021) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(Jos buttler With Daughter Georgia Video Rajasthan Royals Share IPL 2021)

हे ही वाचा :

IPL मध्ये हॅट्रिक कुणी कुणी घेतली? अमित मिश्रा आणि युवराजची जादू, रोहितचा खास अंदाज!, वाचा पूर्ण लिस्ट…

IPL 2021 : कोहलीला ‘विराट’ रेकॉर्ड करण्याची संधी, असा कारनामा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनू शकतो!

चिडक्या डिकॉकवर शोएब अख्तर भडकला, म्हणाला, ‘मला त्याच्या खेळभावनेवर शंका’, पाहा नेमकं प्रकरण काय…?

Published On - 2:12 pm, Tue, 6 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI