Kolhapur : इचलकरंजीतील किसनराव आवळे स्टेडियम आणि शॉपिंग सेंटर खुले, विविध खेळांचे आयोजन

Kolhapur : इचलकरंजीतील किसनराव आवळे स्टेडियम आणि शॉपिंग सेंटर खुले, विविध खेळांचे आयोजन

इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किसनराव आवळे मैदानामध्ये शॉपिंग गाळे आणि भव्य स्टेडियम बांधण्यात आले आहे. या स्टेडियमवर तीन दिवस मैदानी खेळाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 10, 2021 | 7:48 PM

कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील कै. किसनराव आवळे स्टेडियमचे शॉपिंग सेंटर गाळे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, नगराध्यक्षा अलका स्वामी, नगरसेवक अब्राहम आवळे, माजी आमदार राजू आवळे हेही उपस्थित होते.

शहराच्या मध्यभागी भव्य स्टेडियम

इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किसनराव आवळे मैदानामध्ये शॉपिंग गाळे आणि भव्य स्टेडियम बांधण्यात आले आहे. या स्टेडियमवर तीन दिवस मैदानी खेळाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये खो-खो, कबड्डी मल्लखांब यांचा समावेश आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांच्या मोठा हातभार लागला आहे. मंत्रीमहोदयांच्या हस्ते उद्घाटन झाल्यामुळे आमचे काम सफल झाल्याची प्रतिक्रिया यावेळी नगरसेवक अब्राहम आवळे यानी दिली आहे. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील बोलताना म्हणाले, स्टेडियम बघितल्यानंतर मला समाधान वाटले. असेच स्टेडियम माझ्या मतदारसंघांमध्ये  बांधण्याचा मानस मी केला आहे. खेळाडूंना वाव देण्यासाठी अब्राहम आवळे यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. स्टेडियमवर खेळाडू खेळताना मन भरून आले आहे. प्रत्येक खेळाडूला स्टेडियममध्ये वाव मिळणार आहे. त्यासाठी कोणताही निधीची कमतरता पडू देणार नाही.

वत्रनगरी म्हणून इचलकरंजीची ओळख

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले, इचलकरंजी शहर वत्रनगरी म्हणून ओळखले जाते. इथून पुढे या नगरीमध्ये वस्त्र नगरीप्रमाणे खेळाडूंची नावे देशात गाजतील. स्टेडियम अतिशय सुंदर सुसज्ज बांधले आहे. कोल्हापूर प्रत्येक गावांमध्ये तालुक्यामध्ये असे स्टेडियम झाले पाहिजेत आणि खेळाडू निर्माण झाले पाहिजेत असा विश्वास  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला आहे.

Navi Mumbai Crime | मुंबई, नवी मुंबईसह राज्याबाहेर करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला अटक

तर रायगडावर अस्थी ठेवण्याची प्रथा पडेल? नेमकं काय घडलं स्वराज्याच्या ऐतिहासिक किल्ल्यावर?

Omicron : बाप रे! राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण सापडले, मुंबईत 3, पिंपरी-चिंचवडमध्ये 4 रुग्ण सापडल्याने टेन्शन वाढलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें