IND vs NZ : रोहित-जडेजा सोडा, त्यांच्यापेक्षापण अजून एका खेळाडूच्या अपयशाचं जास्त टेन्शन, T20 World Cup मध्ये होऊ शकतं नुकसान
IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया वनडे सीरीज गमावणार असा कदाचितच कोणी विचार केला असेल. पण असं झालय. या पराभवानंतर रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंवर खूप टीका होतेय. पण अजून एका खेळाडूच अपयश त्यापेक्षा जास्त मोठं आहे.

न्यूझीलंडने भारत दौऱ्यासाठी जेव्हा टीमची घोषणा केली, तेव्हा वनडे सीरीजसाठी निवडलेले खेळाडू पाहून अनेक जण हैराण होते. तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये टीम इंडियाला आव्हान मिळणार नाही, भारत सहज जिंकेल असच सर्व बोलत होते. पण न्यूझीलंडने सर्वांनाच धक्का दिला. भारतात पहिल्यांदा वनडे सीरीज जिंकली. टीम इंडियाच्या या पराभवात काही खेळाडूंच्या प्रदर्शनाने खूपच निराश केलं. या सीरीजनंतर रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजावर चहूबाजूंनी टीका सुरु झालीय. पण भारताला सर्वात जास्त फटका बसलाय तो स्टार स्पिनर कुलदीप यादवच्या अपयशामुळे.
पहिला सामना जिंकून भारतीय टीमने या सीरीजची सुरुवात केली होती. पण उर्वरित दोन सामन्यात न्यूझीलंडची टीम भारतावर भारी पडली. या दोन सामन्यांमुळे भारतीय फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पण गोलंदाजी सुद्धा खराब झाली. दुसर्या वनडेमध्ये तर न्यूझीलंडच्या टीमने 3 विकेट गमावून 285 धावांचं मोठं लक्ष्य पार केलं. या मॅचमध्ये टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज आणि स्पिनर्सची जबरदस्त धुलाई झाली.
इकोनॉमी रेट 7.28 चा होता
या सीरीजमध्य वेगवान गोलंदाजांना काही विकेट मिळाले. तेच स्पिन डिपार्टमेंट फ्लॉप ठरलं. रवींद्र जाडेजाला संपूर्ण सीरीजमध्ये एकही विकेट मिळाला नाही. पण कुलदीपच अपयश त्यापेक्षाही मोठं आहे. या सीरीजमध्ये कुलदीप फक्त 3 विकेट घेऊ शकला. विकेट तर त्याला मिळाले नाहीत. पण त्याची गोलंदाजी सुद्धा फोडून काढली. 3 मॅचमध्ये त्याने 25 षटकं गोलंदाजी केली. यात 182 धावा दिल्या. त्याची सरासरी 60.66 ची होती. इकोनॉमी रेट 7.28 चा होता.
अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत
डावखुरा मनगटी स्पिनर कुलदी यादव वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये भारतासाठी विकेटच मोठं आशास्थान आहे. अपेक्षेनुसार त्याने प्रदर्शन सुद्धा केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये त्याने 3 सामन्यात 9 विकेट काढले होते. या सीरीजमध्ये टीम इंडिया अडचणीत असताना स्वाभाविकपणे कुलदीप यादवकडून अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत.
किताब जिंकण्याचं भारताचं स्वप्न अपूर्ण राहिलं
या सीरीजमध्ये कुलदीप यादवचं फ्लॉप होणं त्रास देणारं आहे. कारण टी 20 वर्ल्ड कप जवळ आलेला असताना त्याने अशी कामगिरी केलीय. या वर्ल्ड कपमध्ये वरुण चक्रवर्तीसोबत मिळून मधल्या ओव्हर्समध्ये विकेट काढण्याची जबाबदारी कुलदीपवर असेल. असचं प्रदर्शन वर्ल्ड कपमध्ये कायम राहिल्यास किताब जिंकण्याचं भारताचं स्वप्न अपूर्ण राहिलं. टी 20 वर्ल्ड कपची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. त्याआधी न्यूझीलंड विरुद्ध 5 टी 20 सामन्यांची सीरीज खेळायची आहे.
