Kyle Jamieson IPL 2021 RCB Team Player : अष्टपैलू कायले जॅमिसनच्या समावेशाने विराटसेना अधिक मजबूत

अक्षय चोरगे

|

Updated on: Mar 29, 2021 | 3:31 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने न्यूझीलंडच्या अष्टपैलू कायले जॅमिसन याच्यावर तब्बल 15 कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतलं आहे.

Kyle Jamieson IPL 2021 RCB Team Player : अष्टपैलू कायले जॅमिसनच्या समावेशाने विराटसेना अधिक मजबूत
Kyle Jamieson
Follow us

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने न्यूझीलंडच्या अष्टपैलू कायले जॅमिसन याच्यावर तब्बल 15 कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतलं आहे. गोलंदाजी ही बंगळुरुच्या संघाची कमकुवत बाजू मानली जाते. परंतु आरसीबीने जॅमिसनचा संघात समावेश करुन संघ अधिक मजबूत केला आहे. त्यामुळे बंगळुरुचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये मोठं आव्हान निर्माण करु शकतो.

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कायले जॅमिसन हा 26 वर्षीय युवा खेळाडू न्यूझीलंडचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. 2014 च्या अंडर 19 वर्ल्डकपमध्ये त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर लिस्ट ए आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने न्यूझीलंडच्या संघाचं तिकीट मिळवलं. गेल्या वर्षी (2020) त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं.

कायले जॅमिसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

जॅमिसनला आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यात त्याने तब्बल 36 विकेट्स मिळवल्या आहेत. 48 धावात 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 5 बळी मिळवले आहेत. तर 8 टी-20 सामन्यांमध्ये जॅमिसनने 4 बळी मिळवले आहेत.

फॉरमॅट
सामने
डाव
चेंडू
निर्धाव षटकं
धावा
विकेट्स
सर्वोत्तम गोलंदाजी
इकोनॉमी
सरासरी
SR
4W
5W
कसोटी
2020–
6
12
1202
70
478
36
6/48
2.38
13.3
33.4
1
4
एकदिवसीय
2020–
5
5
276
4
186
5
2/42
4.04
37.2
55.2
0
0
T-20
2020–
8
8
172
0
281
4
2/15
9.80
70.2
43.0
0
0

फलंदाजीत जॅमिसनला फार संधी मिळालेली नाही. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक अर्धशतक आहे. 6 कसोटी सामन्यांमधील 6 डावांमध्ये त्याने 226 धावा फटकावल्या आहेत. एका एकदिवसीय सामन्यात त्याने 25 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटच्या 4 डावांमध्ये त्याने 41 धावा जमवल्या आहेत.

फॉरमॅट
सामने
डावा
नाबाद
धावा
हायस्कोर
सरासरी
BF
BF
SR
100s
50s
कसोटी
2020–
6
6
2
226
51*
56.5
320
64
70.6
0
1
एकदिवसीय
2020–
5
1
1
25
25*
24
24
104.2
0
0
T-20
2020–
8
4
2
41
30
20.5
27
18
151.8
0
0

संबंधित बातम्या

Glenn Maxwell IPL 2021 RCB Team Player : आंतरराष्ट्रीय T-20 मधल्या हिरोचा आयपीएलमध्ये फ्लॉप शो, तरीही कोट्यवधींची बोली

Ab De Villiers IPL 2021 RCB Team Player : टी-20 क्रिकेटचा बादशाह एबी डिव्हीलियर्सचा आयपीएलमध्येही जलवा, मात्र जेतेपदापासून लांब

Virat Kohli IPL 2021 RCB Team Player : रनमशीन विराट कोहली आयपीएलमध्येही अव्वल

Devdutt Padikkal IPL 2021 RCB Team Player : IPL 2020 आणि विजय हजारे स्पर्धा गाजवणारा देवदत्त पडीक्कल पुन्हा धुमाकूळ घालणार?

(Kyle Jamieson IPL 2021 RCB Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos Indian Cricket Players Latest News in Marathi)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI