आधी ‘दगडूशेठ’, आता ‘वारी’, बाला रफिक शेख देवाच्या दारी

पुणे : लाल मातीतला पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाला रफिक शेखने यंदा ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत बाजी मारत, चांदीची गदा आपल्या खांद्यावर घेतली. पुण्याच्या अभिजीत कटकेला चितपट करत बाला रफिक शेखने ‘महाराष्ट्र केसरी’त विजय मिळवला. ‘महाराष्ट्र केसरी’तील विजयानंतर बाला रफिक शेखने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर आता बाला रफिक शेख आता […]

आधी 'दगडूशेठ', आता 'वारी', बाला रफिक शेख देवाच्या दारी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

पुणे : लाल मातीतला पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाला रफिक शेखने यंदा ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत बाजी मारत, चांदीची गदा आपल्या खांद्यावर घेतली. पुण्याच्या अभिजीत कटकेला चितपट करत बाला रफिक शेखने ‘महाराष्ट्र केसरी’त विजय मिळवला. ‘महाराष्ट्र केसरी’तील विजयानंतर बाला रफिक शेखने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर आता बाला रफिक शेख आता माऊलींच्या वारीत सहभागी होणार आहे.

‘महाराष्ट्र केसरी’तल्या धडाकेबाज विजयानंतर बाला रफिक शेख पुण्यात आला. त्याने ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. त्यावेळी, आपल्या विजयाचं सर्व श्रेय हिंदकेसरी दिवंगत गणपतराव आंदळकर यांना अर्पण केले. आता ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकल्यामुळे एक दिवस माऊलींच्या वारीत सहभागी होणार असल्याचे बाला रफिक शेखने टीव्ही 9 मराठीशी बोलातना सांगितले.

बाला रफिक शेख अजून 7-8 दिवस तरी घरी जाणार नाहीय. मात्र, घरात प्रचंड आनंदाचे वातावरण असल्याचे त्याने सांगितले. नवीन तरुणांनी खचून न जाता मेहनत करावी, यश नक्कीच मिळेल, असाही सल्ला त्याने यावेळी दिला.

बाला रफिक शेख ‘महाराष्ट्र केसरी’  

जालना इथं रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2018 ची फायनल लढत पार पडली. यामध्ये करमाळ्याच्या बाला रफिक शेखने पुण्याच्या अभिजीत कटकेवर 11-3 गुणांनी मात करत, महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.

कोण आहे बाला रफिक शेख?

बाला रफिक शेख हा मूळचा सोलापूरचा आहे. तो कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीचा पैलवान आहे. त्याच्या घरात 10 वर्षांपासून कुस्तीची परंपरा चालत आली आहे. बाला रफिक शेखचे वजन-120 किलो, तर उंची-6 फूट आहे. बाला रफिक शेख वयाच्या 13 व्या वर्षी कुस्तीसाठी घर सोडून कोल्हापुरात दाखल झाला. हिंदकेसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांचा तो शिष्य आहे. त्याने डबल महाराष्ट्र केसरी ठरलेल्या चंद्रहार पाटलांकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत. तो सध्या पुण्याच्या हनुमान आखाड्यात सराव करतो.

बाला रफिकच्या घरची परिस्थिती बिकट. पैलवानाला लागणारा दोन वेळचा हवा तसा खुराकही त्याला व्यवस्थित मिळत नव्हता. तरीही आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे सिद्ध करुन दाखवले की, परिस्थिती कशीही असेल, तरीही जर आपण ठरवलं तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.

संबंधित बातम्या :

जो डाव अभिजीत टाकणार होता, तोच बालाने टाकला!

पैलवानांना दिली जाणारी गदा खरंच चांदीची असते का?

‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी बाला रफिक शेख कोण आहे? जाणून घ्या

बाला रफीक शेख यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.