बाला रफीक शेख यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'

जालना : बाला रफीक शेख याने ‘62 वी अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धेची मानाची गदा पटकावली आहे. अभिजित कटकेला पराभूत करत बाला रफीक शेख यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. अंतिम फेरीत बाला रफीकने अभिजित कटकेवर 11-03 गुणांनी मात केली. यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकाविण्यात अभिजित यशस्वी होणार की, बाला रफीक शेख मानाची गदा उंचविणार, याबाबत तमाम …

बाला रफीक शेख यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'

जालना : बाला रफीक शेख याने ‘62 वी अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धेची मानाची गदा पटकावली आहे. अभिजित कटकेला पराभूत करत बाला रफीक शेख यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. अंतिम फेरीत बाला रफीकने अभिजित कटकेवर 11-03 गुणांनी मात केली.

यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकाविण्यात अभिजित यशस्वी होणार की, बाला रफीक शेख मानाची गदा उंचविणार, याबाबत तमाम कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता होती. मात्र बाला रफीक शेखने यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावे केला.

‘62 वी अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती’ किताबची अंतिम दंगल आज जालन्यात रंगली. पुण्याचा अभिजित कटके आणि बुलडाण्याचा बाला रफीक शेख या दोघांमध्ये चुरस झाली. अभिजित कटके हा गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरला होता, मात्र यावर्षी बाला रफीकने हा मान मिळवला.

अभिजित कटके आणि बाला रफीक शेख या दोघांचे वडील चांगले मित्र आहेत. त्यामुळे दोन मित्रांच्या मुलांची लढत बघण्यास सर्वच कुस्तीप्रेमी उत्सूक होते. अभिजित कटके आणि बाला रफीक शेख यांच्या वडिलांमध्ये देखील कुस्ती झाली होती.

महाराष्ट्र केसरीची चमचमती चांदीची मानाची गदा कोण पटकावणार याकडे सर्व कुस्ती रसिकांच्या नजरा लागलेल्या होत्या. मात्र बाला रफीक शेखने जबरदस्त कुस्तीच्या दावपेचांचे प्रदर्शन दाखवत आठ गुणांनी अभिजितला नमवत हा किताब आपल्या नावे केला.

कोण आहे बाला रफिक शेख?

बाला रफिक शेख हा मुळचा सोलापूरचा आहे. तो कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीचा पैलवान आहे. त्याच्या घरात 10 वर्षांपासून कुस्तीची परंपरा चालत आलली आहे. बाला रफिक शेखचे वजन-120 किलो तर उंची-6 फुट आहे. बाला रफिक शेख वयाच्या 13 व्या वर्षी कुस्तीसाठी घर सोडून कोल्हापुरात दाखल झाला. हिंदकेसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांचा तो शिष्य आहे. त्याने डबल महाराष्ट्र केसरी ठरलेल्या चंद्रहार पाटलांकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत. तो सध्या पुण्याच्या हनुमान कुस्ती केंद्रात सराव करतो.

कोण आहे अभिजित कटके?

अभिजित कटके हा मूळचा पुण्याचा मल्ल. गेल्यावर्षी अभिजितने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. याचे वजन- 122 किलो आहे. हा शिवराम दादा तालमितील मल्ल आहे. अभिजितला घरातूनच कुस्तीचे बाळकडू पाजले गेले. त्याचे वडीलही एक कुस्तीपटू होते. अभिजित सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्याला राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धेचा अनूभव आहे. अभिजित कटके हा अमर निंबाळकरांचा शिष्य आहे. शिवराम दादा तालमित जाँर्जियाच्या विदेशी प्रशिक्षकाच्या निगरानीखाली त्याने कसुन सराव केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *