AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

M S Dhoni | शिवारातून थेट परदेशवारी, धोनीने पिकवलेल्या भाज्यांची दुबईत विक्री

महेंद्रसिंह धोनीने टाळेबंदीदरम्यान जैविक पद्धतीने एकूण 43 एकरवर भाजीपाल्यांची लागवड केली होती.

M S Dhoni | शिवारातून थेट परदेशवारी, धोनीने पिकवलेल्या भाज्यांची दुबईत विक्री
| Updated on: Jan 02, 2021 | 3:40 PM
Share

रांची : क्रिकेटमधून निवृ्त्ती घेतल्यानंतर ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) अनेक अभिनव उपक्रम करतोय. तसेच धोनीने क्रिकेटनंतर आपला मोर्चा व्यवसायाकडे वळवला आहे. धोनीने कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायानंतर (Dhoni Kadaknath Cock) आता थेट भाजीविक्री करणार आहे. धोनीच्या शिवारात पिकवलेल्या भाज्यांची  थेट परदेशात भाजीविक्री करण्यात येणार आहे. (mahendra singh dhonis ranchi farm vegetables to sent to Dubai for sale)

धोनीने आपल्या फार्म हाऊसवर भाज्यांची लागवड केली होती. टाळेबंदीदरम्यान धोनीने जैविक पद्धतीने या भाजीपाल्यांची लागवड केली. यासाठी धोनीने 8 लाखांच्या ट्रकॅटरची खरेदी केली होती. धोनीने एकूण 43 एकरमध्ये कोबी, टमाटर, मटर, तसेच पपई, स्ट्रॉबेरी यासह अनेक भाज्यांसह फळांची लागवड केली होती. या भाज्यांची तसेच फळांची विक्री थेट दुबईत केली जाणार आहे.

धोनी आयपीएलनंतर सहकुटुंब दुबईला गेला. तेव्हापासून धोनी तिथेच वेळ व्यतित करतोय. इंडिया टुडेनुसार झारखंड कृषी विभाग धोनीच्या शिवारातील भाजीपाला दुबईला पाठवण्याची व्यवस्था केली आहे. या भाज्यांची विक्री धोनीच्या नावाने केली जाणार आहे.

धोनीच्या नावे लवकरच योजना

झारखंड सरकार लवकरच धोनीच्या नावाने एका योजनेची सुरुवात करणार आहे. या योजनेच्या ब्रॅंड अ‍ॅम्‍बेसीडर पदी धोनीची निवड केली जाणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे अध्यक्ष अभिषेक आनंद यांनी दिली. या योजनेनुसार झारखंड सरकार राज्यातील भाजीपाला धोनीच्या नावाने विकणार आहे. धोनीच्या नावाने सहज भाजी विक्री होईल, तसेच शेतकऱ्यांना लाभ होईल, असा सरकारचा मानस आहे.

धोनीला दशकातील खेळभावना पुरस्कार

आयसीसीने काही दिवसांपूर्वी दशकातील सर्वोत्तम पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये धोनीला दशकातील खेळभावना पुरस्कार जाहीर करण्यात आला. धोनीने नेहमीच मैदानात खिळाडूवृत्तीचं दर्शन घडवलं.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2011 मध्ये नॉटिंघममध्ये सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात इयन बेलला चुकीच्या पद्धतीने बाद घोषित केलं होतं. गैरसमजातून बेल रनआऊट झाला. हा सर्व प्रकार धोनीच्या लक्षात आला. त्यामुळे धोनीने बेलला बाद घोषित केल्यानंतरही फलंदाजीसाठी मैदानात बोलावलं. धोनीच्या या कृतीसाठी आयसीसीने त्याला या पुरस्कराने सन्मानित केलं.

संबंधित बातम्या :

ICC Awards 2020 | धोनीच्या ‘त्या’ निर्णयाला ICC चा कडक सॅल्युट, दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार

MS Dhoni | निवृत्तीनंतर महेंद्रसिंग धोनी कडकनाथ कोंबड्यांच्या व्यवसायात, 2 हजार पिलांची ऑर्डरही दिली

बॅटिंगमध्ये अपयशी-काही जिंकलंही नाही, माजी सलामीवीराचा धोनीवर घणाघात

(mahendra singh dhonis ranchi farm vegetables to sent to Dubai for sale)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.