अर्जुननंतर सचिन तेंडुलकरच्या लेकीचेही लग्न, सारा तेंडुलकर हिच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट, अखेर जावई..
भारतीय क्रिकेट संघाचा माझी स्टार खेळाडू सचिन तेंडुलकर हाच नाही तर त्याची मुलगी सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकरही कायमच चर्चेत असतात. आता सारा तेंडुलकर हिच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट येताना दिसत आहे.

भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्या घरी लग्नीनघाई सुरू आहे. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे लग्न सानिया चांडोक हिच्यासोबत होत आहे. दोघे लहानपणीपासूनचे मित्र आहेत. अर्जुन तेंडुलकर वडिलांच्या पावलावर पाऊस टाकत क्रिकेटमध्ये धमाका करताना दिसतो. मागील अनेक वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून आयपीएलमध्ये क्रिकेट खेळताना दिसला. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा साखरपुडा अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या साखरपुड्याचे काही फोटो पुढे आले. त्यापूर्वी सचिन तेंडुलकर याची होणारी सून नक्की कोण आणि अर्जुन तेंडुलकर कोणाला डेट करत आहे? याबद्दल काहीच कल्पना नव्हती. सानिया चांडोक हिचे वडील आणि आजोबा खूप मोठे व्यावसायिक आहेत. सानिया आणि अर्जुन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते, त्यानंतर त्यांचा साखरपुडा मुंबईत पार पडला.
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचे लग्न आयपीएल पूर्वीच होणार आहे. 5 मार्च 2026 रोजी अर्जुन आणि सानिया यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वीचे समारंभ 3 मार्च रोजी सुरू होतील. सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. अंजली तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर काही दिवसांपूर्वीच लग्नाची खरेदी करताना दिसल्या. ज्याचे फोटो व्हायरल होताना दिसली.
आता नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन तेंडुलकरच्या लग्नानंतर लगेचच सारा तेंडुलकर हिचे लग्न होणार आहे. सानिया घरी येईल आणि सारा तेंडुलकर आपल्या सासरी जाईल. सारा तेंडुलकर हिचे नाव गेल्या काही दिवसांपासून सतत शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात आहे. मात्र, त्यावर दोघांनीही भाष्य करणे टाळले. मात्र, अर्जुन तेंडुलकर याच्यानंतर साराही लग्न करणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर नक्की कोणासोबत लग्न करणार याबद्दल काही खुलासा होऊ शकला नाही. डिसेंबर महिन्यात सारा तेंडुलकर हिचे काही गोव्यातील फोटो व्हायरल होताना दिसले. त्यावरून अंदाज लावला जात आहे की, सारा सध्या आयुष्य जगून घेत असून तिचेही लग्न लवकरच होणार आहे. मात्र, सारा तेंडुलकर हिच्या लग्नाबद्दल अजून तेंडुलकर कुटुंबियांकडून काहीही सांगण्यात आले नाहीये.
