Corona Vaccination | कोरोना लसीकरणावरुन सचिन तेंडुलकरचे हटके ट्विट, म्हणाला….

सचिनने कोरोना लसीकरणाबाबत हटके ट्विट केलं आहे.

Corona Vaccination | कोरोना लसीकरणावरुन सचिन तेंडुलकरचे हटके ट्विट, म्हणाला....
निवृत्तीनंतरही सचिनची कमाईत जोरदार बॅटिंग

मुंबई : देशासह विविध राज्यात आजपासून कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination) सुरुवात झाली. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PMO) यांच्या हस्ते तर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना वॉरियर्सना सर्वात आधी कोरोना लस देण्यात आली. लसीकरणाच्या मुद्दयावरुन टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendlkar) एक भन्नाट ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे सचिनने देशवासियांना लसीकरणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (master blaster sachin tendulkar tweet on corona vaccination)

सचिनने ट्विटमध्ये काय म्हटलंय?

सचिनने या ट्विटमध्ये देशवासीयांना लसीकरणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सचिनने या ट्विटमध्ये कोरोना आणि क्रिकेटची तुलना करत हे ट्विट केलं आहे. ” कोरोनाविरोधातील लढा हा टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीसारखा आहे. दोघांसमोर अनेक चढउतार आले. टीम इंडियाच्या फलंदाज कोरोना वॉरियर्ससारखे पीचवर घट्ट पाय रोवून उभे राहिले. आपण या कोरोना वॉरियर्सचं आणि टीम इंडियाच्या फलंदाजांचे अभिनंदन करायला हंव”, असं सचिनने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सचिनचं जनतेला आवाहन

या ट्विटमध्ये सचनिने देशवासियांना आवाहनही केलं आहे. सचिन म्हणाला की, “कोरोनाविरोधातील लढाई आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका संपलेली नाही. यामुळे सावध राहा, गाफील राहू नका.

चौथा कसोटी सामना

दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात ब्रिस्बेनमध्ये चौथ्या कसोटीतील दुसरा दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना पहिल्या डावात 369 धावांवर गुंडाळले. त्यानंतर टीम इंडियाने चहापानापर्यंत 2 विकेट्स गमावून 62 धावा केल्या. पावसाच्या व्यत्यायामुळे अखेरपर्यंत खेळाला सुरुवात करता आली नाही. यामुळे सामनाधिकाऱ्यांनी उर्वरित खेळ रद्द केला. पावसामुळे दुसऱ्या दिवशी अपेक्षित षटकांचा खेळ झाला नाही. यामुळे ही भरपाई भरुन काढण्यासाठी तिसऱ्या दिवशी सामन्याला लवकर सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 4th Test | नटराजन आणि वॉशिंग्टनचा कारनामा, पदार्पणात अफलातून कामगिरी

Aus vs Ind 4th Test | वॉशिंग्टन ‘अतिसुंदर’, पदार्पणातील सामन्यात विक्रमाला गवसणी

Rohit Sharma | सेहवाग बनने का शौक है? हिटमॅन रोहित शर्मा ट्रोल

(master blaster sachin tendulkar tweet on corona vaccination)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI