MI vs SRH Playing 11, IPL 2021 | मुंबई विरुद्ध हैदराबादमध्ये रंगणार लढत, अशी असेल दोन्ही संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 14 व्या हंगामात (IPL 2021) आज मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (sunrisers hyderabad) यांच्यात लढत रंगणार आहे.

MI vs SRH Playing 11, IPL 2021 | मुंबई विरुद्ध हैदराबादमध्ये रंगणार लढत, अशी असेल दोन्ही संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन
आयपीएलच्या 14 व्या हंगामात (IPL 2021) आज मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (sunrisers hyderabad) यांच्यात लढत रंगणार आहे.
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 5:04 PM

चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) नववा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी या हंगामातील प्रत्येकी 2 सामने खेळले आहेत. मुंबईने 1 सामना जिंकला असून 1 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर हैदराबादवर दोन्ही सामन्यात प्रतिस्पर्धी संघांनी मात केली आहे. त्यामुळे हैदराबाद या सामन्यात विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरेल. तर मुंबई विजयी कामगिरी सुरु ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. (mi vs srh ipl 2021 playing 11 today match mumbai indians vs sunrisers hyderabad)

सामना जिंकण्यासाठी प्लेइंग इलेव्हन मजबूत असणं आवश्यक आहे. हैदराबादला पहिल्या दोन्ही सामन्यात याचाच फटका बसला. परिणामी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तर दुसऱ्या बाजूला मुंबईची पराभवाने सुरुवात झाली. मात्र दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत पुनरागमन केलं.

हैदराबादसमोर मधल्या फळीची समस्या

हैदराबादला मिडल ऑर्डरची डोकेदुखी सतावत आहे. टॉप ऑर्डरच्या चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलण्यात कुठेतरी कमी पडत आहेत. किंवा टॉप ऑर्डरच्या ढिसाळ कामगिरीमुळे मीडल ऑर्डरवर कुठेतरी दडपण येत आहे.

मनिष पांडे टीकेचा धनी

हैदराबादचा पहिल्या 2 सामन्यात पराभव झाला. या पराभवासाठी मनिष पांडेला कारणीभूत ठरवलं जात आहे. मनिषने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. कोलकाताने हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात मनिषने 39 चेंडूत 38 धावा केल्या. म्हणजेच मनिषला 100 च्या स्ट्राईक रेटनेही धावा करता आल्या नाही. त्याच्या या संथ खेळीचा हैदराबादला लाभ झाला नाही.

मनिषसमोर वेगवान खेळीचे आव्हान

मनिष चांगली फलंदाजी करतोय. मात्र त्याला आवश्यक त्या वेगाने फटकेबाजी करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे मुंबई विरुद्धच्या या सामन्यात मनिषसमोर चांगली आणि विजयी कामगिरीचे आव्हान असणार आहे. तसेच हैदराबादमधून या तिसऱ्या सामन्यासाठी विजय शंकरला डच्चू देण्यात येऊ शकतो. त्याच्या जागी प्रियम गर्गला संधी मिळू शकते.

मुंबईमध्ये 1 बदल होण्याची शक्यता

मुंबईच्या पलटणमध्ये बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र तरीही 1 बदल केला जाऊ शकतो. मुंबईच्या जेम्स निशामच्या जागी मार्को जेनसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

दोन्ही टीमचे संभावित अंतिम 11 खेळाडू

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चाहर, जिमी निशाम, ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

सनरायजर्स हैदराबाद

डेव्हीड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, प्रियम गर्ग, केदार जाधव, राशिद खान, जेसन होल्डर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, शहबाज नदीम आणि टी. नटराजन.

संबंधित बातम्या :

IPL 2021 MI vs SRH Head to Head | मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने, ‘या’ 4 खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरणार

IPL 2021 MI vs SRH : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, सामना कधी, कुठे, केव्हा?

(mi vs srh ipl 2021 playing 11 today match mumbai indians vs sunrisers hyderabad)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.