ओवेसींनंतर मोहम्मद कैफनेही पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला

मुंबई : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा चांगलाच समाचार घेतलाय. भारतातल्या नरेंद्र मोदी सरकारकडून अल्पसंख्यांकांसोबत अन्याय केला जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता. या वक्तव्याचा समाचार घेत कैफने एक ट्वीट केलं. ट्वीटमध्ये कैफ म्हणतो, “फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये 20 टक्के अल्पसंख्यांक होते. आता केवळ दोन टक्के उरले आहेत. …

ओवेसींनंतर मोहम्मद कैफनेही पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला

मुंबई : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा चांगलाच समाचार घेतलाय. भारतातल्या नरेंद्र मोदी सरकारकडून अल्पसंख्यांकांसोबत अन्याय केला जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता. या वक्तव्याचा समाचार घेत कैफने एक ट्वीट केलं.

ट्वीटमध्ये कैफ म्हणतो, “फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये 20 टक्के अल्पसंख्यांक होते. आता केवळ दोन टक्के उरले आहेत. तर दुसरीकडे भारतात अल्पसंख्यांकाची संख्या सातत्याने वाढली आहे. अल्पसंख्यांकांना कशी वागणूक दिली जावी यावर लेक्चर देणारा पाकिस्तान हा शेवटचा देश असावा”.

अल्पसंख्यांकांना कशी वागणूक द्यायची असते ते आम्ही मोदी सरकारला दाखवून देऊ, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं. या बातमीला कोट करत कैफने इम्रान खान यांचा समाचार घेतला. वाचामोदींसाठी बॅरिस्टर ओवेसी रणांगणात, इम्रान खानना सडेतोड उत्तर

कैफच्या अगोदर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही इम्रान खान यांची बोलती बंद केली होती. अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावरुन इम्रान खान यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आणि त्यानंतर बॅरिस्टर ओवेसी मैदानात उतरले. पाकिस्तानचा खरा चेहरा त्यांनी दाखवून दिला.

“पाकिस्तानच्या घटनेनुसार, फक्त मुस्लीम व्यक्तीच पाकिस्तानचा राष्ट्रपती बनू शकतो. मात्र, भारतात विविध समाजातील व्यक्त राष्ट्रपती बनले आहेत, बनू शकतात. त्यामुळे इम्रान खान साहेब, तुम्ही खरंतर आमच्याकडून शिकायला हवं की, सर्वसमावेशक राजकारण कसं करतात आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कांचं संरक्षण कसं करतात.”, असं ट्वीट ओवेसींनी केलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *