AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Cricket : भारताविरुद्ध मिळवलेल्या त्या एका विजयामुळे आमचं भरपूर नुकसान झालं, युसूफने सांगितलं पाक क्रिकेटच्या घसरणीमागचं कारण

Pakistan Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानची घसरण सुरु आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये कॅप्टन असो वा कोच कोणी फार काळासाठी स्थिर राहत नाही. त्यांच्या क्रिकेटमध्ये सतत बदल सुरु असतात. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने यासाठी भारताविरुद्ध मिळवलेल्या एका विजयाला जबाबदार धरलं आहे.

Pakistan Cricket : भारताविरुद्ध मिळवलेल्या त्या एका विजयामुळे आमचं भरपूर नुकसान झालं, युसूफने सांगितलं पाक क्रिकेटच्या घसरणीमागचं कारण
Pakistan Cricket _
| Updated on: Sep 07, 2026 | 5:16 PM
Share

दुबईत 2021 साली टी 20 वर्ल्ड कप झाला. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारतावर 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला होता. वनडे आणि T20 या दोन प्रकारात वर्ल्ड कप टुर्नामेंट होते. पाकिस्तानने कुठल्याही वर्ल्ड कपमध्ये भारतावर मिळवलेला हा पहिला आणि एकमेव विजय आहे. आज पाकिस्तान क्रिकेटमध्ये जे संकट आहे, त्यासाठी हा विजय जबाबदार आहे असं पाकिस्तानचा माजी स्टार क्रिकेटपटू मोहम्मद युसूफच मत आहे. या मॅचआधी पाकिस्तानने कधीही वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये भारताला हरवलं नव्हतं. बाबर आझमने नाबाद 68 आणि मोहम्मद रिझवानने नाबाद 79 धावा केल्या होत्या. पाकिस्तानने एकही विकेट न गमावता भारताचं 152 धावांचं लक्ष्य पार केलं होतं. पाकिस्तान क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक क्षण होता.

या विजयामुळे पाकिस्तान क्रिकेटपटूंची विचार करण्याची पद्धत बदलून गेली असं मोहम्मद युसूफ यांना वाटतं. या विजयामुळे खेळाडूंचा अतिआत्मविश्वास वाढला. पुढे काय करायचं हे त्यांना समजलं नाही असं मोहम्मद युसूफने म्हटलय. “2021 मध्ये भारताविरुद्ध आम्ही तो जो सामना जिंकला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचं भरपूर नुकसान झालं. कारण त्या विजयानंतर खेळाडूंना असं वाटू लागलं की, आम्ही बरच काही मिळवलय. पुढे काय करायचय हेच त्यांना समजत नव्हतं. जेव्हा तुम्ही चांगलं करताय, तेव्हा विनम्र असलं पाहिजे. तुम्ही वर्तणूक बदलली, तुम्ही अनादर करणं सुरु केलं, तर समस्या निर्माण होतात. पाकिस्तान क्रिकेटमध्ये तेव्हापासूनच अडचणी सुरु झाल्या” असं मोहम्मद युसूफने समा टीव्हीशी बोलताना सांगितलं.

बरेच कोच आले आणि गेले

त्या लोकप्रिय विजयानंतर पाकिस्तानी संघाची वागणूक बदलली असं मोहम्मय युसूफ यांना वाटतं. कर्णधारपदासाठी आपसात स्पर्धा हे सुद्धा वादामागे एक कारण असल्याचं युसूफ यांना वाटतं. संघातला प्रत्येकजण पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बनण्याचा प्रयत्न करत होता. त्या परिणामांचा अजूनही पाकिस्तान क्रिकेटला फटका बसतोय. “वनडे वर्ल्ड कप, टी 20 वर्ल्ड कप, आशिया कप, चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तानी संघाचं प्रदर्शन तुम्ही पाहा. कामगिरी खूप भयंकर आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भरपूर सहकार्य केलं. बरेच कोच आले आणि गेले. पाकिस्तानी टीमला मदत करण्यासाठी बऱ्याच गोष्टी बदलल्या. पण कुठल्याही खेळाडूने जबाबदारी घेतली नाही. अखेर पीसीबीने तो निर्णय घेतला. माझं त्यांना समर्थन आहे” असं मोहम्मद युसूफ म्हणाला.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा